सोमवार, २० एप्रिल, २०२०

#माणूस विवेक हरवतो तेव्हा...

     'मुन्नाभाई MBBS पिच्चरमध्ये एक दृश्य आहे,ज्यात एक तरुण(नवाजुद्दीन सिद्दीकी) मुन्नाच्या वडिलांचं(सुनील दत्त) पॉकेट मारतो.हे लोकांना कळतं तेव्हा लोक त्याला बेदम मारतात. आपण कोणाला मारतोय आणि का मारतोय? त्याच्याशी आपला काही संबंध आहे का?
ज्याला मारतोय तो कोण आहे?
त्याने खरेच गुन्हा केला आहे का? ह्याची कोणीही चौकशी न करता वाहत्या गंगेत हात धुवून घेतात.
ज्याचं पॉकेट मारलंय,ज्याचं नुकसान झालंय तो चोराला माफ करतो, तो काहीच शिक्षा करत नाही आणि लोकांना सांगतो त्याला काहीही करू नका.तरीही लोक त्याला मारतात.
माणूस एकटा असतो तेव्हा त्याला डोकं(मेंदू) असतो.पण जेव्हा तो जमाव,झुंड बनतो तेव्हा त्याचा मेंदू 'विवेक' विसरून जातो.गर्दी ही बिनडोक असते.आपण जे करतोय ते योग्य करतोय का?
नैतिक,कायदेशीर आहे का?
ह्याचा विचार गर्दी, झुंड कधीच करत नाही.
    प्रत्येकाच्या मनात बऱ्याच काळापासून साठलेला राग,संताप,द्वेष,तिरस्कार,चीड,नैराश्य असते.इतके दिवस दबून राहिलेलं हे सगळं अचानक उफाळून येतं आणि माणसे अचानक हिंसक होतात.इथं माणसे विवेक,नीती,कायदा,योग्य-अयोग्य सगळं विसरून जातात आणि प्रचंड हिंसा करतात.खून,अत्याचार,जाळपोळ,तोडफोड,सामूहिक हत्या हे सगळं माणूस विवेक हरवल्यामुळं करतो.माणूस जमावाचा भाग झाला कि एवढा अस्थिर,निष्ठुर,क्रूर होतो आणि कोणत्याही थराला तो जातो.
हे भयंकर घृणास्पद,लाजिरवाणे आहे.कितीतरी माणसे मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि मनोरुग्ण असल्यासारखं वागत आहेत.त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी आधी स्वतःला आणि नंतर शक्य तितक्या लोकांना 'विवेक' जागृत ठेवून योग्य-अयोग्य,नैतिक-कायदेशीर काय आहे हे तर्काच्या आधारे ठरवायला प्रशिक्षित करणं गरजेचं आहे आणि आपल्या मानसिक आरोग्याचं विश्लेषण, मूल्यमापन केलं पाहिजे. हे नाही केलं तर मग लै अवघड होणार आहे.दुर्दैवाने त्याची लाजिरवाणी, संतापजनक उदाहरणे आपण आजूबाजूला रोज टीव्ही,पेपर मध्ये बघत असतो.😓
    लहान मुलापासून वृद्ध व्यक्तीपर्यंत सगळ्यांनाच आपण अभ्यासक्रम आणि सामाजिक कार्यक्रम या माध्यमातून विवेकी-तर्काधिष्टीत वर्तन करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्रशिक्षित करणं हे अतिशय महत्वाचे आहे.आपल्या मनातील चिंता,नैराश्य, राग,चीड याला योग्य वाट मोकळी करून देऊन निचरा करण्यास आणि त्याचा विधायक उपयोग करण्यास शिकलं पाहिजे.
--चि.दयानंद माने

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...