परवाच्या दिवशी माझ्या ऑफिस मध्ये एक गोंडस आणि एकदम सुंदर फुलपाखरू घिरट्या घालत होते. विशेषतः माझ्या खुर्चीशेजारी जास्तच...आणि ते जाईना पण लवकर...तिथेच घुटमळत होते...जणू काही ते मला कुठेतरी न्यायला आले होते...
मग माझं थोडं विश्र्वांतरण झालं...त्याला पकडावं असं वाटलं आणि लगेच लक्षात आलं, कि आत्ता आपण वेगळ्या ठिकाणी आहोत आणि आपण काही आत्ता लहान राहिलो नाहीत...आणि त्याला तरी बिचाऱ्याला पकडून उगाच का डिस्टर्ब करावे?
मी त्याला केलेला स्पर्श त्याला नाही आवडला तर?
आणि चुकून मी त्याला जवळ घेतले आणि त्याला माझ्या हातांचा पिंजराच जर जवळचा वाटू लागला तर?
आणि समजा माझी नियती बिघडली आणि मी त्याला माझ्या हौस आणि शौक पूर्ण करण्यासाठी त्याला तुरुंगात बंदिस्त केले तर?
मला इथे काही थोडी बंधने लागली तर गुदमरायला होते...तर मग ह्याला कसे वाटेल?
मग म्हटलं जाऊद्या द्या नाद सोडून...आपल्याभोवती काही वेळ घिरट्या घालत आहे तर त्यालाही आपला सहवास एन्जॉय करुद्यावं...पुन्हा कदाचित त्याला हे भाग्य मिळेल अथवा नाही... आणि त्याचं ते हवेत मुक्तपणे भिरभिरणच किती मस्त वाटतंय...
आणि बराच वेळ असं वाटत होतं की ह्याला मला काहीतरी सांगायचं आहे...पण त्याला नक्की काय म्हणायचं असेल बरं? अजुन पण कळेना...🤔
तर...माझं आपलं हे उगीच काहीतरी...माझ्या कल्पनेचे विश्व😍😃
मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८
फुलपाखरू
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
#बालदिन...
आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...
-
आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...
-
जीवनात अनिश्चितता(Uncertainty) खूप आहे.अलीकडे तर ती खूपच वाढत आहे.उद्या काय आणि कसे होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे.अगदी आज सायंकाळपर्यंत का...
-
'नमस्कार!!धिस इज कॉल्ड ऍज 'कंदील'.ह्यात मी बसले आहे.माझं नाव चिमणी, मी पूर्वी उजेड द्यायची.पण आत्ता 'लायटी'च्या 'प्र...