गुरुवार, १६ जानेवारी, २०२०

#एका अल्लडपणाची गोष्ट...#एका 'माझ्या न होऊ शकलेल्या' चहाचा बेत...

       काल संध्याकाळी अचानक माझ्या मनात आलं की कुठंतरी लांबच्या प्रवासाला जाऊया.मग बाहेर रोडला येऊन थांबलो आणि ठरवलं की जी पहिल्यांदा येईल त्या बसमध्ये बसायचं आणि थोड्या वेळात ती आली.ती(बस) सांगलीमार्गे जात होती. मग बसलो यष्टीत आणि काढलं तिकीट सांगलीचं...म्हटलं चला सांगलीला जाऊन फिरून येऊ.काही बघणं शक्य नव्हतं पण फक्त चहा प्यायचा होता...सांगलीचा 'चहा' पिऊन लगेच माघारी यायचं होतं... पण वाटेवरच दोस्तांचं(सुयश) 'जुणोनी' हे गाव होतं. जाताजाता त्याला भेटायचं ठरलं आणि थोडा विचार केला की, उद्या ड्युटीवर लवकर जायचं आहे आणि म्हणून लवकर रिटर्न जायला हवं...मग मी अचानक सांगलीला जाण्याचा प्लॅन चेंज केला आणि सुयशकडे उतरलो.'जुणोनी' हे सोलापूर-सांगली हायवेवरचं गाव खरेतर डाळींबाच्या बागाच एवढया आहेत की गावाचं नाव 'डाळिंबीनी' पाहिजे होतं...😄
मग जुन्या मित्राला आणि त्याच्या घरी सगळ्यांना भेटून,जीव खूष झाला, शेतातलं हिरवंगार घर आणि तशीच हरित मनाची सुयशच्या घरची माणसे, आईबाबा-भैय्या यांना भेटून आणि ते सगळं अनुभूवून आम्ही पुन्हा स्टॅण्डवर आलो. मग पुन्हा स्टॅण्डवर तिची वाट पाहण्यात अर्धा तास गेला... शेवटी ती आली आणि माझा सुटकेचा निःश्वास सुटला.यष्टीत मात्र मला झोप लागेना...रस्त्याच्या चालीवर यष्टी सारखी डान्स करत होती आणि ड्रायव्हर पण जरा दमल्यासारखा वाटत होता. मी मात्र सतत कावराबावरा होत आजूबाजूला बघत आणि सतत ड्रायव्हरकडे लक्ष देत होतो. अशा तऱ्हेने यष्टीतून बाहेर मस्तपैकी रंगीबेरंगी घरं,परतीच्या चांगल्या पावसामुळे भरलेली तळी, ओढे, द्राक्ष, डाळिंबाच्या बागा, एकदम झक्कास आलेली ज्वारी हे सगळं सुंदर सुंदरसुंदर दृश्य खिडकीतून बघत होतो आणि यष्टीतली पण सुंदर दृश्ये आणि माणसे टक लावून बघत होतो...😄मग नंतर यष्टीत काही नमुने भेटले. त्यांची थोडी मज्जा घेतली.दोन व्यक्तींचं प्रेमाचं भांडण पण चोरून ऐकलं हसवून गेलं 😀.मस्त रोमँटिक गारगार आणि आल्हाददायक हवा झोम्बण्याचा फिल घेतला...आणि मग मी मध्यरात्री साडेबाराच्या ठोक्याला सुखरूप गडावर पोहोचलो...
खरंतर कधीकधी बदल म्हणून असं 'कुछ तुफानी करते है' टाईप काहीतरी करायला मज्जा येते. काही टार्गेट नव्हतं आणि अचानक निघालो होतो आणि फक्त फिरायचं होतं, जास्त काही अपेक्षा आणि उद्दिष्टे नव्हती.या छोट्याशा वेडेपणामुळे मला ज्जाम मज्जा आली आणि त्यातही सध्या 'चिरंजीव' असल्याने कोणी विचारणारे नव्हते त्यामुळे तर जास्तच बिनधास्त फिरता आल्याने खूप मज्जा आली...😄
#दया

शनिवार, ११ जानेवारी, २०२०

#दयाची कल्पना(Daya's Fantasy)

कधीकधी वाटतं कि,हे नोकरी-सर्व्हिस-करियर-शिक्षण असलं काहीकाळ सोडून
मस्तपैकी एखाद्या गवताळ कुरणात गाई-म्हशी-शेळ्या चरायला घेऊन जावं,सोबत एक 5-6 हजार गाण्यांचा चार्जिंग न संपणारा टेप घेऊन जावं;गुरांसोबत फिरताना मस्तपैकी रानातली फुलं गोळा करावी,चिंचा-बोरं-वाळकं-शेंदाडी असा रानमेवा पोट भरून खावा;
पक्षांची सुंदरसुंदर घरटी,त्यांचे त्यातले 2-3 BHK फ्लॅट्स बघावे;मध गोळा करावा किंवा एखाद्या पोळ्यातून लिकेज होऊन मध ओघळत असावा आणि आपण अलगद तो चाखावा;ओढ्यातल्या पाण्यात खडे टाकत भाकरी बनवाव्यात;सुंदरसुंदर हरणं, साप,मोर बघावेत,त्यांचे विविध आवाज ऐकावेत आणि स्वतःही तसे आवाज काढावेत;खूप दमल्यावर गाईम्हशीवर बसावं आणि टकावटकाव करत मजेत तिन्हीसांजेला घरी यावे.अहाहा!कसलं भारी असेल राव हे सगळं!
पण फक्त कल्पनाच परवडेबल आहे.प्रत्यक्षात चांदण्याला भुकेला (चांदणं खाणारा) चकोर पक्षी भेटणं जेवढं मुश्किल तेवढंच हेही...
#दयाची कल्पना(Daya's Fantasy)

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...