शनिवार, ११ जानेवारी, २०२०

#दयाची कल्पना(Daya's Fantasy)

कधीकधी वाटतं कि,हे नोकरी-सर्व्हिस-करियर-शिक्षण असलं काहीकाळ सोडून
मस्तपैकी एखाद्या गवताळ कुरणात गाई-म्हशी-शेळ्या चरायला घेऊन जावं,सोबत एक 5-6 हजार गाण्यांचा चार्जिंग न संपणारा टेप घेऊन जावं;गुरांसोबत फिरताना मस्तपैकी रानातली फुलं गोळा करावी,चिंचा-बोरं-वाळकं-शेंदाडी असा रानमेवा पोट भरून खावा;
पक्षांची सुंदरसुंदर घरटी,त्यांचे त्यातले 2-3 BHK फ्लॅट्स बघावे;मध गोळा करावा किंवा एखाद्या पोळ्यातून लिकेज होऊन मध ओघळत असावा आणि आपण अलगद तो चाखावा;ओढ्यातल्या पाण्यात खडे टाकत भाकरी बनवाव्यात;सुंदरसुंदर हरणं, साप,मोर बघावेत,त्यांचे विविध आवाज ऐकावेत आणि स्वतःही तसे आवाज काढावेत;खूप दमल्यावर गाईम्हशीवर बसावं आणि टकावटकाव करत मजेत तिन्हीसांजेला घरी यावे.अहाहा!कसलं भारी असेल राव हे सगळं!
पण फक्त कल्पनाच परवडेबल आहे.प्रत्यक्षात चांदण्याला भुकेला (चांदणं खाणारा) चकोर पक्षी भेटणं जेवढं मुश्किल तेवढंच हेही...
#दयाची कल्पना(Daya's Fantasy)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...