सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

#आपल्या लिहिण्या बोलण्याचा उद्देश,कारण काय?

       मनातलं मेंदूमंथनातून आलेलं बरंवाईट बाहेर टाकणं, ते ओझं रिकामे करणे एवढंच  की बाकी कोणतातरी उद्देश असतो?? 
    आपल्या कोणत्याही प्रकारे व्यक्त होण्याचे पुढे काय परिणाम होतील किंवा नाही याचा विचार फारसा करू नये.थोडक्यात काही बाबतीतले बोलणे किंवा लिहिणे हे निर्माल्य पाण्यात सोडल्यासारखं सोडून द्यायचं असतं. प्रतिक्रियांचं ओझं घ्यायचं नसतं. आपली मानसिक, वैचारिक, स्वाभाविक गरज व व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू म्हणून स्वतःसाठीच बोलायचं, व्यक्त व्हायचं असतं. आपली मानसिक गरज आणि मेंदूत उपजत असणारी जिज्ञासा, कुतूहल(Curiosity) आणि मग त्यातून आपल्या अंतरंगात होणारी खलबते आणि त्यातून बाहेर पडणारे काहीतरी उत्पादन आणि कोणत्याच गोष्टीकडे कायम न्यूट्रल राहून शांत राहू न शकण्याची कदाचित आपली मूलभूत वृत्ती हे सगळं करण्यास आपल्याला प्रवृत्त करत असावी...आजूबाजूच्या घडणाऱ्या सगळ्या गोष्टींना काहीतरी प्रमाणात आणि कोणत्यातरी स्वरूपात प्रतिसाद देण्याची एक नैसर्गिक प्रेरणा आपल्यात असते आणि यातूनच मग आजूबाजूच्या आपल्या Sphere of Influence ला आपण आपल्या लिहिण्या,बोलण्या-वागण्यातून व्यक्त होत प्रतिसाद देत असतो...थोडक्यात आपल्या एकांकिकेची किंवा अनेकांकीतली आपल्या वाट्याला आलेली भूमिका कमीअधिक प्रमाणात आपण वठवत असतो आणि आजूबाजूच्या Sphere of Influence मधून किंवा बाह्यवर्तुळातून येणारे प्रतिसाद, प्रतिक्रिया, होणारे परिणाम ह्याचा फारसा परिणाम पुन्हा आपल्यावर होत असतो जो किती प्रमाणात करून घ्यायचा किंवा नाही घ्यायचा ते ज्यांचं त्यानं ठरवायचं असतं...And कदाचित that's it all...😃
बरोबर??
---✍ दया

रविवार, ८ डिसेंबर, २०१९

#जडणघडण-धारणा व संस्कार

        आपल्या बेसिकमध्येच लै मोठा लोचा हाय. अगदी नेणत्या वयापासून जाणतं होईपर्यंत जडणघडणच चुकीच्या धारणांवर होते. हे असं असतं, ते तसं असतं असं चुकीचं, अर्धवट शिकवल्यामुळे आपल्यातल्या बऱ्याच जणांचं बेसिक शेवटच्या श्वासापर्यंत कच्चंच राहतं...० ते ६ घरात कुटुंबीय आणि पाहुण्यांद्वारे मुलगा किंवा मुलगी म्हणून होणारे संस्कार आणि घडवले जाणारे बालमन, ६ ते १८ पर्यंत कुटुंबीय आणि भोवतालचे मोठे(वयाने) लोकं यांच्याकडून घडवले जाणारे किशोरमन आणि मग पुन्हा शालेय अभ्यासक्रमातील त्रुटी, आणि आपल्या समाजातील रचनात्मक लोचे, इंटरनेट ह्यांनी बरोबर मुलगा किंवा मुलगी यांची स्त्री-पुरुष म्हणून मानसिकता घडवली जाते...आणि ते बरोबरच आहे हे आपण मेंदूत घट्ट धरून बसतो. आणि डोळे उघडे व मेंदू जाग्यावर ठेऊन तर्क-विज्ञानाच्या निकषांवर ते पडताळून बघत नाही आणि मग अनिष्ट घडत जातं आणि आपण फक्त न्यायालय, व्यवस्था,पोलीस, प्रशासन,आणि ज्यांच्यावर अन्याय घडला त्या पीडितांना दोषी ठरवून मोकळे होतो...पण आपल्या बेसिक्समधले कच्चे दुवे, फालतू धारणा यांना दूषण लावून ते बदलण्याकामी लक्ष देत नाही...
#आत्मपरीक्षण
#मानसिकता
-✍चि.दयानंद

शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

#डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स, इंडिया

     जिथं कोणताही राजकीय हस्तक्षेप नसेल किंवा अत्यंत मर्यादित,कमी Political Interference असेल अशा वातावरणात सर्व्हिस,नोकरी, व्यवसाय करायला मिळणं ही सध्या खूप लोकांची इच्छा आणि गरज आहे.राजकीय हितसंबंध,हस्तक्षेप, बेकायदेशीर-नियमबाह्य कामांचे लागेबांधे आणि टेबलाखालून, टेबलावरून होणारे पद्धतशीर व्यवहार आणि त्यातून स्वतःला अलग ठेवण्यास आणले जाणारे अडथळे आणि मोकळेपणे काम करण्यास होणारे सततचे अटकाव हे सगळं मनःस्थितिला आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या इच्छेला सुरुंग लावायला लागतं आणि आर्थिक हितसंबंध टाळता येणंसुदधा अवघड आहे सोबतच नियमबाह्य कामांचा तगादा,हितसंबंधी लोकांची नाराजी,त्यातून उदभवणारा मानसिक,आर्थिक,कायदेशीर जाच-मनस्ताप,असुरक्षितता हे सगळं टाळता येईल असं क्षेत्र कधीही चांगलं.
    काही उणिवा असल्या तरी चालेल पण अनैच्छिक मिंधेपणा आणि बाह्य वर्चस्व यामुळं तुटलेपणाची भावना निर्माण होणार नाही  आणि आपल्याला काम करायला मोकळं अवकाश मिळणं हीच मोठी उपलब्धी असेल असं एखादं क्षेत्र असावं...
एकवेळ या सगळ्या कटकटीतून मुक्त असलेलं आणि आजघडीलातरी कामासाठी बहुतांशी स्वच्छ अवकाश   असणारे आणि बाह्य घटकांचा अजिबात त्रास नसणारे रेल्वे-पोस्ट्स-अशी केंद्रीय डिपार्टमेंट्स कधीही उत्तम वाटतात...
        असं कालच एका राज्य सरकारच्या अधिकारी व्यक्तीसोबत बोलताना त्यांनी वरील मत माझ्यासोबत शेअर केलं...👆🏻
--चि. दयानंद
जय डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स, इंडिया🤩🤩✌🏻✌🏻

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

◆गुन्हे व शिक्षा-मानसिकता व आत्मपरीक्षण

#फाशी/देहदंड
#गुन्हे आणि शिक्षा
#मानसिकता-आत्मपरीक्षण
   
      खरेतर गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच हवी. त्यामुळं गुन्हेगारांना जरब बसते. फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा ही Rarest of Rare Cases मधेच Implement केली जाते. खालच्या कोर्टाने जरी देहदंडाची शिक्षा सुनावली तरी अपिलात बऱ्याच वेळा ती शिक्षा नाहीशी होऊन सौम्य शिक्षा होते.
आणि जर गुन्हेगाराची परिस्थिती खरंच सुधारण्यासारखी असेल तर त्याला राष्ट्रपतींद्वारे माफीची व्यवस्था सुद्धा केली आहे. पण काही वेळा असेही झाले आहे की शिक्षा सौम्य झाल्यानन्तर शिक्षा भोगून झाल्यावर त्याच गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. आणि गंभीर गुन्हेगार मोकाट सुटले तर समाजातसुद्धा दहशतीचे वातावरण राहते. त्यामुळे आयुष्यभर सश्रम कारावास किंवा दुर्मिळ केसमध्ये फाशी ही व्हायलाच पाहिजे. मान्य आहे फाशी दिल्यामुळे गुन्हे संपणार नाहीत पण शिक्षेच्या भीतीने गुन्ह्याचे प्रमाण निश्चितच कमी होईल.
        बऱ्याच वेळा फाशी जाहीर झाल्यावर लोक आनंदाने नाचतात, पेढे वाटतात. पीडित व्यक्तीला न्याय मिळाला याचा जर हा आनंद असेल तर ठीक आहे पण गुन्हेगाराला जाहीर चौकात फोडून काढा, हे कापा ते कापा असे म्हणणे म्हणजे आपल्यातील सुप्त राग आणि विचित्रपणा व्यक्त करणे होय. लोकांच्या मनातील भावना आपण समजू शकतो. पण अशा गोष्टीतून, अशा मत व्यक्त करण्यातून आपण माणूस म्हणून किती हीन आणि खालचा विचार करतो हे जाणवते. आणि गुन्हेगाराला फाशी झाल्यामुळे आणि त्याच्या नीच कृत्यामुळे त्याच्यासुद्धा कुटुंबाची नंतर फरफट होत असते आणि गेलेला जीव किंवा झालेली हानीसुद्धा भरून येत नसते.
फक्त गुन्हेगाराला शिक्षा झाली याचा आनन्द न मानता पीडित व्यक्तीला न्याय मिळाला याचा आनन्द मानला पाहिजे. इथं दोन दृष्टीकोणात अगदी सूक्ष्म फरक आहे पण हा फरक महत्वाचा आहे.गुन्हेगाराला शिक्षा झाल्यावर किंवा गुन्हा घडल्यावर ज्या तावातावात ही शिक्षा द्यावी, ती शिक्षा द्यावी हे आपण बोलतो त्याच उत्साहात आपण स्वतः कुठे अशाच प्रकारचा कमी तीव्रतेच्या गुन्हा करत तर नाही ना?
आपले कुठे चुकत आहे का?
आपण स्वतः नक्की समाजात विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत कसे वागत आहोत?
आपण पण त्यांच्यावर कळत नकळत अन्याय तर करत नाही ना?
आपली मूल्यव्यवस्था कुठे चुकत आहे?
हा विचार करायला हवा.
     शिक्षा जाहीर झाल्यावर न्यायव्यवस्थेच्या त्या निर्णयाचा आदर करायला हवा पण फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा जर लोक आनंदाने celebrate करत असतील तर ते सुशिक्षित समाजाचे लक्षण नक्कीच नाही. शिक्षेचा उद्देश हा काही बदला घेणे हा नसतो तर गुन्हेगारात बदल व्हावा आणि पुन्हा अशा गोष्टी घडण्यास पायबंद व्हावा हा असतो.
काही लोक जेव्हा शिक्षा झाल्यानन्तर ज्या राक्षसी पद्धतीने आनंद व्यक्त करतात त्यातून हे दिसून येते की या गुन्ह्याने ज्यांचे घर जळाले आहे त्यांचे दुःख लोकांना समजलंच नाही.त्यांच्या दुःखाचे गांभीर्य विसरून आपण आपल्या मनातील सुप्त रागाचे समाधान करून घेत असतो. जर का जळाळेले घर, झालेला अन्याय दुरुस्त होणार असेल तर नक्कीच आनंद व्यक्त करूया.
माजुरा आनंद साजरा करण्यापेक्षा आपल्यातली क्रूरता, आपल्यातला निचपणा संपवावा आणि आनंद साजरा करावा.
        आपल्या बोलण्याने, नजरेने, कोणाकडे बघण्याने, वागण्याने जर कोणाही व्यक्तीला असुरक्षित वाटणार नाही,त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला जमल्यावर आनंद व्यक्त करूया.अशा घटनांतून आपण यापुढे असे काही होणार नाही यासाठीची जाणीव रुजवायचा प्रयत्न करायला हवा.
    आणि   गुन्हा करताना माणूस विचारच करत नाही म्हणून तर गुन्हा घडतो कारण त्यावेळी त्याचा मेंदू ठिकाणावर नसतोच आणि त्यावेळी तो मेंदू विचार करण्यास प्रवृत्त व्हावा यासाठी आपण स्वतःवर आणि आपल्या मुलांवर तसे मूल्यसंस्कार रुजवणे अत्यंत महत्वाचे आहे.यातूनच एक विवेकी, शहाणपणाने वागायची मानसिकता घडत जाईल...बस्स आपण स्वतः आणि आपली मुले वैयक्तिक पातळीवर 'माणूस' म्हणून वागली तरी खूप झालं...बाकी कायदा,व्यवस्था त्यांचं काम करेलच...कारण आपणच सामूहिकरीत्या कायदा आणि व्यवस्था आहोत...

#वि.सूचना: कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याला, अन्यायाला विरोधच आहे आणि तो असावाच. इथे फक्त विरोध,प्रतिकार व निवारण करताना एक नागरिक, एक समाज म्हणून आपण कशी दुटप्पी, असंस्कृत, भूमिका घेतो आणि अन्याय निवारण करण्यासाठी आपणच निर्माण केलेल्या कायदा,न्यायालय, पोलीस, प्रशासन आणि मूल्यशिक्षण या गोष्टींना आणखी मजबूत, सुधारित करण्याऐवजी त्यांनाच आपण कसे पायदळी तुडवतो हे सांगायचं आहे.

--✍ चि. दया
06 डिसें 2019

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

##सोशल??

#सोशल मीडिया
#फेसबुक-व्हाट्सअप्प
#मोबाईल
     1)वेळ कमी पडतोय तरीही आपल्याला बोअर का होतंय?
उत्तर-एखादी गोष्ट करणं आणि ती करतानाचा आनंद घेणं आपण सोडून दिलं आहे.एकत्र आलो तरी सेल्फी आणि ग्रुप फोटोसाठी एकत्र येतो.तेवढंच पुढच्या आठवड्यात स्टेटस ला खुराक होऊन जातो.मित्रांची भेटपण यांत्रिक झाली आहे फक्त सोशल मीडियावर दाखवण्यासाठी.सोशल मीडियावर दाखवायला काहीच नाही राहीलं की लोकांना नैराश्य यायला लागतं.

2) आपण व्हाट्सअप्प आणि फेसबुक वर तासन्तास चॅटिंग करतो...
हे खरंच बोरिंग नाही का?
डायरेक्ट भेटून बोललं तर किंवा फारतर फोनवर बोललं तर किती भारी ना!
बोलतानाचे हावभाव, इंटेन्सीटी,शब्दावरचे जोर, आवाजातील चढउतार हे चॅटिंग करताना जाणवतं का हो?
किंवा दोनचार पाने लिहून समोरच्या व्यक्तीला पाठवलं तर?
तासभर चॅटिंग करूनसुद्धा संभाषन आणि संवाद शून्यच झालेला असतो.
तेच महिन्यातून फक्त एक फोन केला तरी उत्तम संवाद होतो. नाही का?

3)मी खूप खूष आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप रसिक आहे, मी जगण्याचा खूप आनंद घेतो, मी खूप सोशल आहे, मला सामाजिक-राजकीय गोष्टींमधील बरंच काही कळतं...
              किंवा
 मी खूप टेन्शन मध्ये आहे, मी दुःखी आहे, माझं ब्रेकअप-पॅचअप झालंय,
मी खूप अडचणींचा सामना करतोय.
माझ्या वैयक्तिक, कौटुंबिक आयुष्यात हेहे चांगलं किंवा वाईट चालू आहे.मी खूप बिझी आहे, मी खूप गरीब किंवा पैसेवाला आहे, मी भारी भारी मोबाईल-गाडी वापरतो किंवा अतिशय साधे राहतो,
हे सगळं फेसबुक, व्हाट्सअप्प वर सांगायची खरंच गरज असते का हो?
त्याने खरंच फायदा होतो का?
कोणाला किती फायदा झाला कोणी कृपया सांगेल का?  हे सगळं आपण सोशल करायची गरज असते का?
म्हणजे माणसाने व्यक्त व्हावं, बोलावं, आपलं म्हणणं आणि आपले अनुभव लोकांशी share जरूर करावेत पण त्याला काहीतरी नियम, पद्धत, प्रमाण असेल ना?
म्हणजे आपलं खासगी जीवन आपण सगळ्यांसमोर उगाच खुलं का करतो?
आपण खरंच आपल्या खासगीपणाचा आनंद घेतो का?
जर आपण खरंच आनंद घेत असू तर मग आपल्या बऱ्याच जणांचे चेहरे मी पाहतो तेव्हा सारखेच उदास, निराश, तणावात का असतात?

4) पिच्चर पाहायला थिएटर ला गेलो तर इंटर्व्हलमध्ये लगेच मोबाईल उघडतो.पण विचार करतो का?
की पिच्चर मध्ये काय घडलं? पुढे काय घडेल? मित्राच्या लग्नात गेलो की फोटो टाकायचीच आपली गडबड असते.आपण मित्राच्या घरच्यांची, नातेवाईकांची चांगली ओळख करून घेतो का?तिथला परिसर, माणसे यांच्याशी आपले बंध जुळवतो का?फोटोमधली किती माणसे आपल्याला चांगलं ओळखत असतात? घरात नवीन काहीतरी केलं,आणलं तर घरच्यांचं कौतुक कमी आणि फोटो जास्त होतात.नाही का?

5) मोबाईल आणि सोशल मीडिया चा अतिशय भयंकर घाण नाद लागला आहे आपल्याला.माणसे बोलत असतात, घरी कुटुंबीय बोलत असतात, आजूबाजूला छानछान गोष्टी घडत असतात, आपला मित्र किंवा मैत्रीण जीव तोडून बोलत असतात आणि आपण शहाणे काय करत असतो?
तर किती लाईक्स मिळाल्या?कोणी काय पोस्ट केलं?सारखं बोटं खालीवर स्क्रोल करत असतो.डोकं बधिर व्हायला लागलं आहे. बऱ्याच गोष्टी लक्षात राहिना झाल्या आहेत लोकांच्या . लोकांचं डोकं मोबाईलमुळे कमी काम करायला लागलं आहे..

6) रविवारी सुट्टी आहे.फक्त पूर्ण एक दिवस मोबाईल पूर्ण बंद ठेवायचा आणि संध्याकाळी स्वतःची अवस्था बघायची.सकाळी आणि अगदी संध्याकाळपर्यंत जीव कसनुसा अस्वस्थ होतो.कुठंच मन लागत नाही.पण रात्री झोपताना छान वाटायला लागतं.5 मिन झाले की लहान लेकराने चड्डी ओली केली का? तसे कोणाचा msg आला का ते पाहावे लागते.10 मिन करमत नाही mob शिवाय.हे सत्य आहे की नाही?सगळेच असे नाहीत पण बरेचजण आहेत.ज्यांना मोबाईल चांगला वावरता येतो त्यांना सलाम.पण ज्यांना तो नीट वापरता येत नाही त्यांच्यासाठी ह्या माझ्या उचापती."मोबाईल ही एक आपल्यासाठी आपणच बनवलेली वस्तू आहे आणि ती आपल्याच खिशात आहे. कुठं पळून जाणार नाही. तो आपल्यासाठी आहे नाकी आपण मोबाईलसाठी" हे ज्यांना कळलं त्यांना सलाम आणि बाकीच्यांना-कळावे🙏🏻

7) मलासुद्धा कधिकधी मोबाईल जास्त वापरला की डोकं सुन्न व्हायला लागतं.काही गोष्टी लक्षात राहत नाहीत.आणि त्याच्यापासुन दूर राहिलं की डोकं चांगलं काम करतं. परवा चष्म्याचा नंबर तपासायला गेलो तेव्हा चर्चा झाली आणि मग बोलताबोलता डॉक्टरनी सांगितलं की हल्ली बऱ्याच लोकांचे डोळे रडतात-पाणी गाळतात.मोबाईल खूप वापरल्यामुळे.तुम्हीही जास्त वापरत असाल तर प्लिज कमी करा सर. स्क्रीन लाईट मुळे डोळे खराब होतात. हे मला MBBS-डोळेतज्ञ यांनी सांगितलं बरंका.मलासुद्धा मोबाईल चा थोडा नाद आहे.पण मी मोबाईल चा वापर कमी करत आलो आहे.अजून कमी करायचा आहे.किमान जाणीव तरी झाली आहे की हे प्रमाणात व्हावं.अती होऊ नये.
#शेवटी काय तर "जान है तो जहाँ है।"

8) सोशल मीडिया, मोबाईल अजिबातच वाईट नाही. आपण ज्या पद्धतीने तो वापरतो ती पद्धत वाईट आणि हानिकारक आहे...
वस्तू, Utility कशी Use करावी हे कळणं ह्यालाच शहाणपण म्हणतात...
बाकी काही नाही...
#सगळं चांगलंच आहे...What Matters Is...The Way We Behave with the Utilities That We have Invented For Our Convenience and not for Sticking them as A Trap...
🙏🏻😃🕵
--✍✍चि. दयानंद
#TheDayaSays

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

#भारतीय नागरिकहो....


#भारतीय नागरिकहो....
#एकदा विचार कराल प्लिज?

    शेतकऱ्यांच्या हमीभावाचं काय झालं?
शेती उत्पन्नवाढीचं काय झालं?
घटत असलेल्या शेतीक्षेत्राचे आणि शेतीच्या घटणार्या उत्पादकतेचे काय झाले?

चांगले रस्ते कुठं गेले?
खड्डे कुठून आले?
वाड्यावस्त्या, दूरस्थ खेडी यांच्या रस्त्याचे काय झाले?

नोकऱ्या/रोजगार कुठं गेले?
नवीन उद्योग/व्यवसाय निर्मिती आणि वाढीचं आणि त्यासाठीच्या सहाय्याचे व सहजतेचे काय झाले?

प्रशासनात रिक्त असलेल्या अनेक पदांच्या भरतीचे काय झाले?
कर्मचाऱ्यांवर असलेल्या अतिरिक्त ताणाच्या कामांची पर्यायी व्यवस्था करण्याचे काय झाले?

मनुष्यबळ विकास ह्या संकल्पनेच्या खोलवर अंमलबजावणीचे काय झाले?

शाळांच्या सुविधांचे काय झाले?
शिक्षणाच्या गुणवत्तावर्धनाचे काय झाले?
सहज-आनंदी शिक्षणाचे काय झाले?

मराठी शाळा, मराठी भाषा संवर्धनाचे काय झाले?

सशस्त्र दलांकडे असलेल्या शस्त्रांच्या व सुविधांच्या आणि त्यांच्या दर्जाच्या वाढीचं काय झालं?

पोलिसांच्या कामाच्या पद्धतीत आणि त्यांच्यावरच्या अतिरिक्त कामांमुळे खालावत जाणाऱ्या सेवेच्या दर्जात सुधारणा करण्याचे काय झाले?

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या वाढवून त्यांना आणखी सक्षम व सुप्रशिक्षित करून त्यांच्या शस्त्र, व वाहनांच्या दर्जात करायच्या सुधारणांचे काय झाले?

तुंबणाऱ्या गटारी, नाले आणि त्यामुळं जलमय होणारी शहरे आणि गावांची सुधारणा कोण करणार?

साध्यासाध्या पायाभूत सुविधांचे आणि Fast Connectivity चे काय झाले?

दवाखान्याच्या सुविधांचे काय झाले?
चांगल्या औषधांचे/डॉक्टरांचे काय झाले?
अलीकडे प्रचंड वाढलेल्या मानसिक आजारांबद्दल जनजागृती करून लोकांच्या मानसिक आरोग्याची काळजी कोण घेणार?

नागरिकांना सेवा मिळण्यात होणाऱ्या दिरंगाईचे/कुचराईचे आणि सेवेच्या दर्जाचे काय झाले?

रस्ते/नद्या/सार्वजनिक जागा यांच्या स्वच्छतेचे काय झाले?
भुजलसंवर्धन,वनआच्छादनवाढीचं काय झालं?

महिला आणि वृद्ध,बालके या अवलंबित्व असलेल्या लोकांच्या सुरक्षितता, संगोपन, आणि सबलीकरणाचे काय झाले?

कितीतरी वर्षे रखडत चाललेल्या,सर्वसामान्यांच्या जिवावर बेतणाऱ्या असंख्य फायलींचं काय झालं?

सन्माननीय न्यायालयांत कित्येक वर्षे पेंडिंग पडलेल्या आणि वाढत जाणाऱ्या केसेस चा निपटारा करण्यासाठीच्या प्रयत्नांचे काय झाले?

वाढत जाणारी बुडीत कर्जे, बुडणारे उद्योग, बुडणाऱ्या बँका यांच्याबाबतीत करायच्या उपायांचे काय झाले?
     कृपया मतदान करण्याआधी काही प्रश्न स्वतःला आणि सरकार,प्रशासन,नेते यांना विचारायला हवेत आणि त्यांची उत्तरे शोधायला हवीत...
जो कोणी वरील प्रश्न सोडवण्यासाठी लढला आहे किंवा लढतो आहे अशाच लायक माणसाला मत दिलं पाहिजे...
तरच आपल्याला 'आम्ही भारताचे नागरिक' म्हणवण्याचा अधिकार आहे...अन्यथा नाही...

जर आपण स्वतः जेव्हा आधी राजकीय व आर्थिक प्रगल्भ होऊ तेव्हाच आपण एक "प्रगल्भ,सुजाण लोकशाही" म्हणून वाटचाल करू शकू...
कोणीतरी म्हटलं आहे की
"People Get The Government, Leaders They Deserves..."

आपल्या पुढच्या पिढीला एक चांगली लोकशाही सुपूर्द करण्यासाठी हे केलंच पाहिजे...
काय म्हणता भारतीय नागरिकहो?
✍✍चि. दयानंद

गुरुवार, २७ जून, २०१९

#Being Practically Positive...

#Being Practically Positive...

    अशाश्वत आणि अनिश्चित क्षेत्रात, प्रवासात नेहमी वास्तवाला धरून , सत्यपरिस्थिती जाणुन सुरक्षित पल्ला आधी गाठणं आणि मग तिथून पुढील पल्ल्यासाठी रणनीती तयार करून रणशिंग फुंकणं कधीही श्रेयस्कर असतं... ही प्रक्रिया किंचित वेळखाऊ पण सुरक्षित, शाश्वत आणि आनंददायी आहे...हे सगळं प्रेयस नसेल पण श्रेयस नक्कीच आहे...कारण आपण कितीही समर्थ असलो तरी तीच उमेद आणि परिस्थिती सातत्याने चिरंतर राहील याची खात्री नाही...आणि कदाचित टप्याटप्याने सावध पावले टाकत गेलो गेलो तर आवश्यक ग्राऊंडनिर्मिती व्हायला मदत होऊ शकते...बऱ्याच वेळा अवास्तव आशाकांक्षा उद्विग्नतेला जन्म देतात...
आणि शेवटी मानवी स्वभावानुसार प्रत्येकाला स्थिरता, सुरक्षितता आणि शांततापूर्ण आनंदी जीवन हवं असतं... जिथं त्याला स्वतःला त्याच्या उन्नतीसाठी अवकाश मिळेल तो थांबा पांथस्थ स्वीकारतो...

शुक्रवार, २१ जून, २०१९

#दया म्हणे...

कसंय ना...
     मिळालेले अपयश, होणारे अपमान, मिळणारी हिणकस-कमीपणाची वागणूक, इतरांचं पाण्यात बघणं, शाळकॉलेजात बॅकलॉग ला राहिलेले विषय, झालेला/ले प्रेमभंग, रोज होणारे छोटेछोटे अपेक्षाभंग, आर्थिक संकटे, कित्येक गोष्टींची आयुष्यात राहिलेली उणीव, खूप इच्छूनपण सतत हुलकावणी देणारी स्वप्ने, अडथळे आणणारी अन् खच्चीकरण करणारी माणसे, झालेले विश्वासघात, जमीनदोस्त करणारे अपघात, आपल्या व्यवहार्य अशा तत्व-विचारांच्या विरोधात घडणाऱ्या- न पटणाऱ्या सामाजिक गोष्टी, आईबापांच्या अन् भावाबहिणीच्या, बायकोमुलांच्या डोळ्यातील अपूर्ण आकांक्षा आणि ओघळलेले अश्रू... हे सगळं छुपी चीड निर्माण करतं आणि सळसळत्या उर्जेला, काहीतरी अभिनव करून दाखवण्याच्या उर्मिला जन्म देत असतं आणि कित्येक सुंदर गोष्टी प्रसृत करतं...
So...Enjoy Beauty of These Feelings Too...😃

#दया म्हणे...
#निरीक्षण

#दया म्हणे...

कसंय ना...
     मिळालेले अपयश, होणारे अपमान, मिळणारी हिणकस-कमीपणाची वागणूक, इतरांचं पाण्यात बघणं, शाळकॉलेजात बॅकलॉग ला राहिलेले विषय, झालेला/ले प्रेमभंग, रोज होणारे छोटेछोटे अपेक्षाभंग, आर्थिक संकटे, कित्येक गोष्टींची आयुष्यात राहिलेली उणीव, खूप इच्छूनपण सतत हुलकावणी देणारी स्वप्ने, अडथळे आणणारी अन् खच्चीकरण करणारी माणसे, झालेले विश्वासघात, जमीनदोस्त करणारे अपघात, आपल्या व्यवहार्य अशा तत्व-विचारांच्या विरोधात घडणाऱ्या- न पटणाऱ्या सामाजिक गोष्टी, आईबापांच्या अन् भावाबहिणीच्या, बायकोमुलांच्या डोळ्यातील अपूर्ण आकांक्षा आणि ओघळलेले अश्रू... हे सगळं छुपी चीड निर्माण करतं आणि सळसळत्या उर्जेला, काहीतरी अभिनव करून दाखवण्याच्या उर्मिला जन्म देत असतं आणि कित्येक सुंदर गोष्टी प्रसृत करतं...
So...Enjoy Beauty of These Feelings Too...😃

#दया म्हणे...
#निरीक्षण

सोमवार, १ एप्रिल, २०१९

#निवढणूक, शाही-लोकशाही

#निवडणूका
#लोकशाही
#सुजाण नागरिक
#स्वातंत्र्य- माझं, त्याचं-तिचं, तुमचं, आपलं

      एखादा व्यक्ती सेलिब्रिटी, ऑफिसर,राजकारणी, अभिनेता आहे आणि तुम्ही त्यांचे फॅन किंवा चाहते आहात...आणि त्यांचं वागणं हे तुमच्या अपेक्षांशी जुळत नाही...तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी...
की वरचं सगळं असूनही ते स्वतः एक 'स्वतंत्र' व्यक्ती आहेत. त्यांना स्वतःची आवडनिवड, मतं आहेत...आणि तुम्हाला अपेक्षा ठेवायचा किंवा इतर राजकीय अधिकार आहेत तसंच त्यांनासुद्धा आहेत...
आणि त्यांचं व्यावसायिक जीवन, वैयक्तिक-कौटुंबिक जीवन, सामाजिक-राजकीय जीवन हे वेगवेगळं आहे एवढं कसं समजत नाही?
त्यांचं वैयक्तिक/व्यवसायिक जीवन हे सामाजिक जीवनापासून वेगळं का नाही करत आपण?
अभिनेता फक्त चित्रपटसृष्टीत असतो. बाहेर तो आपल्यासारखाच सामान्य नागरिक असतो. तो अभिनेता/सेलिब्रिटी आहे म्हणून तो निवडून येण्यास 'लायक' असतो असं नसतं... आणि एखाद्यानं त्याच्या घरात/वैयक्तिक आयुष्यात चांगलं किंवा वाईट(लोकांच्या चष्म्यातून?) केलेलं असलं तर त्याने आपलं काय घोडं मारलंय?
आपल्याला काय करायचंय कोण त्याच्या आयुष्यात काय करतोय ते?
त्याने/तिने आपल्या देशासाठी/लोकांसाठी काहीतरी केलं असेल तर ते आपल्याला महत्वाचं आहे.
आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत किंवा मतं विरोधी(न पटणारी) आहेत म्हणून त्यांचा व्यक्ती/नागरिक म्हणून आदर न करता उगाच फालतू/निरर्थक प्रतिक्रिया/शेरेबाजी करणं हे बरोबर आहे का?
संसदीय/संवैधानिक भाषेत खूप उत्तम पद्धतीने टीकाटिप्पणी करता येते...
आपण स्वतः आधी एक नागरिक/स्वतंत्र विचारसरणीचे व्यक्ती आहोत आणि मग नंतर कोणत्यातरी व्यक्तीचे/पक्षाचे कार्यकर्ते/हितचिंतक असतो...
एखाद्याची विचारसरणी, सामाजिक चारित्र्य, लोकसेवेची क्षमता, सद्यस्थितीतल्या प्रश्नांची जाण आणि ते मार्गी लावण्यासाठीचे उपाय योजण्याची इच्छाशक्ती हे निकष पडताळून पाहिले जावेत...
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे वारसदार आहोत आपण! आणि जगातील सर्वात प्रगल्भ(Mature) लोकशाहीच्या निर्मितीची जबाबदारी असलेले उत्तराधिकारीसुद्धा आहोत आपण!

#असो, जस्ट गम्मत

✍✍--चि.दया

शनिवार, ९ मार्च, २०१९

#चिमण्या-पाखरं

     आमच्याकडे रब्बी हंगामात 'पाखरं राखणे' हा शब्दप्रयोग सुगीच्या अलीकडे सर्रास वापरला जातो...Actually 'पाखरं राखणे' म्हणजे 'पाखरं न राखता' पाखरांपासून धान्य राखणे(वाचवणे) असा होतो.म्हणजे गोफण घेऊन धोंडे मारणे, मानवी कपड्यांची बुजगावणी उभारून पाखरांना घाबरवणे इत्यादी...
     तर ह्यावर्षी आपल्या शेतात दुष्काळी परिस्थितीतसुदधा ज्वारीनं चांगलीच उभारी घेऊन ती मस्त फोफावली आहे.यावर्षी दुर्दैवानं आमच्या सोलापूर जिल्ह्यात खूप ठिकाणी ज्वारी उपजलीच नाही...
त्यामुळं पाखरांना खायला काहीच नाहीये...त्यामुळं आई-पप्पांसोबत  'पाखरांवर' रम्य चर्चा सुरू असताना पप्पांना मी म्हटलं, यावर्षी आपण 'पाखरं राखायची' नाहीत...त्यांना किती खायचं ते खाऊ द्या. त्यांनी खाऊन जे शिल्लक राहिल ते आपल्याला...कारण कित्येक दिवस गायब असलेली पाखरं जथ्यांनी दिसायला लागली हे काय कमी आनंदाचं हाय व्हय!
      3 दिवसांपूर्वीच एक दोस्त म्हणाला, दया, आरं लका हल्ली चिमण्या-पाखरं कुठं दिसंना झाल्यात...बहुतेक 'दुसऱ्या पाखरांवरचं' लक्ष हटवुन ते जर खऱ्या पाखरांकडं दिलं तर आजूबाजूला दिसतील वाटतंय चिमण्या-पाखरं...😃
    आणि सुदैवानं, चिक्कार चिमण्या-पाखरं आपल्या घरात आणि शेतात अगदी सहकुटुंब रोज तळ ठोकून असतात...कित्येकांना पाखरं बघायला आवर्जून ट्रिप काढून जावं लागतं, अशा जमान्यात आपल्या घरात पाखरांनी यावं, किलबिलाट करावा आणि त्यांच्या चिवचिवाटाने अक्ख घर उजळून,संगीतमय व्हावं यासारखं दुसरं भाग्य नाही हो..

-दया म्हणे😃✍

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

#Concentric Circles

आपले मित्र, नातेवाईक हे सगळं Concentric Circles (एककेंद्री वर्तुळे)  सारखे असतात...
त्यांच्या केंद्रस्थानी आपण असतो...
मग Frequency, Wavelength कशी जुळते यानुसार मग कोण कोणत्या वर्तुळात, कोण कोणत्या परिघावर हे ठरतं...Frequency Wavelength च्या संबंधात कसा बदल होत जातो त्यानुसार ह्या वर्तुळातील लोकांची स्थाने बदतल असतात...
फक्त एक गोष्ट कटाक्षाने पाळली पाहिजे...काहीही होवो...केंद्रबिंदू अढळ आणि स्थिर असला पाहिजे...नाहीतर मग सगळीच वर्तुळे सुद्धा अस्थिर होतात आणि सगळी वर्तुळे Overlap झाली की सगळं Collapse होतं...
त्यामुळं आपणसुद्धा आपलं आणि आपल्या संबंधांचं(जुळणं किंवा न जुळणं) योग्य मूल्यमापन केलं पाहिजे...Frequency- Wavelength म्हणजे थोडक्यात स्वभाव जो की नक्कीच Adjustable-बदलक्षम आहे त्याचा डोळस आणि Ego विरहित विचार व्हायला हवा...आणि Speed सुद्धा जुळला पाहिजे म्हणजे आचार-विचार गती जीला आपला वागणं(Behaviour)  म्हणूया.ही गती(वागणं) कुठंतरी आसपास असली पाहिजे मग वर्तुळातील स्थानावरून म्हणजे मी जवळचा किंवा लांबचा, तो जवळचा किंवा लांबचा असे होणारे संघर्ष आपोआप कमी होतील आणि इगोयुद्धाला कुठेतरी स्वल्प/दीर्घविराम मिळेल...
-✍✍चि. दयानंद
#TheDayaSays
#दया म्हणे...

बुधवार, १६ जानेवारी, २०१९

#कॉपीराईट

# एक सांगू का?
   आजकाल Copyright चे कायदे आहेत...म्हणजे एखाद्याने लिहिलेल्या पुस्तकात कोणी फेरबदल नाही करू शकत...

पण...पण...पूर्वी copyright नव्हते...तेव्हा कोणीही त्याला वाटेल तसे बदल उपलब्ध ग्रंथात करू शकत होता...आणि हा हजारो वर्षांचा खूप मोठा कालावधी आहे...आणी जरी हे बदल केले असले तरी, केलेले बदल लक्षात यायला सुशिक्षित आणि जाणता समाज नगण्य होता तेव्हा...
तर मुख्य प्रश्न असा की, सध्या उपलब्ध जुन्या-पुराण-प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिलेला मजकूर किती प्रमाणात खरा मानायचा?

तू आणि तूच...भाग 2...😄

तू वाद,

तू संवाद,

तू मिलाफ,

तू तल्लफ,

तू साफ,

तू वाफ,

तू कफ,

तू रफ,

तू रोग,

तू सोंग,

तू राग,

तू माग,

तू साद,

तू सांधा,

तू कंधा,

तू वांधा,

तू चाह,

तू राहू,

तू वाह!

तू पनाह,

तू गुनाह,

तू संधी,

तू मंदी,

तू चंदी,

तू चांदी,

तू सोनं,

तू नाणं,

तू जाणं,

तू लेणं,

तू झेन,

तू पेन,

तू शाई,

तू पाऊस,

तू हाऊस,

To Be Continued

तू...आणि तूच...😄

तू आठवण...

तू साठवण...

तू वणवण...

तू भलामण...

तू पुरण...

तू धोरण

तू मनी

तू मेनी

तू लामन...

तु कवन…

तू लवण...

तु पुण्य...

तू धन्य...

तू लावण्य...

तू अरण्य...

तू शरण...

तू हरण...

तू मरण...

तू पर्ण

तू पूर्ण

तू जीर्ण

तू अजीर्ण

तू गोजिरी

तू साजिरी

तू लाजिरी

तू गोड

तू गॉड

तू निशा,

तू नशा,

तू आशा,

तू उषा,

तू तृषा,

तू अंगाई,

तू दिरंगाई,

तू चराई,

तू कुचराई

To Be Continued...

सोमवार, १४ जानेवारी, २०१९

#शंकेचा FIR


त्यांनी शंकेचा FIR दाखल केला...
तथाकथित रक्षकांनी दखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला...
अन् मी कायद्याच्या राज्यात बेदखल झालो...
अहंकारी फिर्यादीने 'कलम'धारी चा 'कलमेधारी' आरोपी मला केला...
जेव्हा माझ्या निर्दोषत्वाला वकील कोणी मिळेना...
तेव्हा अटकेपार झेंडा रोवण्याच्या या मनिषाधारीला पार अटकेत त्यांनी डांबले...
कथित रामशास्त्र्यांच्या अदालतीने
आमचा अटकपूर्ण जामीन इतक्या सहजतेने फेटाळला कि,
क्षणिक आम्हांसही खुद्द गंभीर गुन्हेगारच वाटलो आम्ही...
सगळ्याच ओळखीच्या साक्षीदारांच्या आत्ता स्वतंत्र अदालती झाल्या होत्या...
सुटकेची याचिका तरी आम्ही कोणत्या खंडपीठाकडे करावी?आम्ही स्वकीयांच्या विश्वासात इतके धुंद झालो होतो की,
त्यांनीच कधी साक्षी फिरवल्या अन काळकोठडी कधी सुनावली गेली ह्याची भ्रांतच राहीली नाही...
साध्यासरळ मनाला झटकाच असा बसला होता की,
जगण्याच्या उर्मीचा केव्हाच अंत झाला होता...
मग मुकाट्याने चौकशीला सामोरे गेलो...
अन झाला फैसला फासावर चढवण्याचा...
'फास' शब्द ऐकताच अचानक धुंदीतून बाहेर आलो...
अन जगण्याची उर्मी पुन्हा बळावली...
अचानक स्फुरण चढलं अन
मीच माझा वकील जाहलो...
त्वेषाने अन हिम्मतीने खटल्याचा प्रतिवाद करत राहीलो...
शंकेच्या चुकचुकणाऱ्या असंख्य पाली खाली कोसळल्या...
मनाच्या नितीकायद्याची कलमे फेकू लागलो...
मग कोसळू लागले ती भ्रमित कारस्थान्यांचे युक्तिवाद...
अन जिंकू लागले माझे कार्यनीतीचे प्रतिवाद...
अखेरीस पेटलेल्या माझ्या शब्दज्वाळांची हाय त्यांना लागु लागली...
एक एक पुन्हा स्वार्थसुरक्षित पडद्याआड जाऊ लागला...
आरोपांच्या फैरी झाडणाऱ्यांच्या बंदुका अखेरीस निकामी झाल्या...
मजबूर रामशास्त्र्यांनासुद्धा मग निवाडा राखून ठेवावा लागला...
अन पुढे आमचे अपील इतके गरजले  की या कथित न्यायवाद्यांची गच्छंती करूनच ते थांबले...
आरोपी अन गुन्ह्याचा तो डाग-शिक्का घेऊनच बाहेर पडलो...
पूर्वीच्या सरळ माणसाचा आत्ता बेपर्वा, बेफिकीर माणूस झाला होता...
डागाळलेलाच पण प्रचंड तापलेला अन कित्येकांना भस्मसात करणारा मनुष्यसूर्य माझा झाला होता...

✍--चि. दयानंद

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...