बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

# गांधी

     शेवटी काय तर गांधींमुळे देश स्वतंत्र झाला की नाही हे महत्त्वाचं नाही तर ह्या माणसाने चळवळ समाजाच्या अगदी शेवटच्या थरापर्यंत पोचवली आणि विशेषतः स्त्रियासुद्धा मोठ्या संख्येने सामील झाल्या. उद्योगपतींपासून ते मजुरापर्यंत सगळे हातात हात घालून एकत्र आले...आत्तासारखं तेव्हा टीव्ही-फेसबुक-व्हाट्सअप्प नसताना प्रचंड विविधता असलेल्या 30 कोटींच्या या देशाला एकत्र आणणे ही सोपी गोष्ट आहे का?
काहीही असो तेव्हाच्या जनतेच्या मनात आत्मविश्वास आणि निर्भयता निर्माण केली आणि खऱ्या अर्थाने चैतन्य निर्माण केलं ते कोणी?
फक्त 'गांधी' या साध्या धोतरवाल्या माणसाने...स्वातंत्र्य मिळो अथवा ना मिळो पण ह्या माणसाने लोकांना स्वयंस्फूर्तीने लढायला शिकवलं...
आज लोकांना 10 लोकांचं आपलं कुटुंब तरी एकत्र ठेवता येतं का?
आणि हे तेच लोकं महात्मा गांधीला विचित्र,किळसवाण्या पद्धतीने शिव्या देतात...
आपली 10 माणसं एकत्र बांधून ठेवायची योग्यता नसणारी लोकंसुद्धा म्हणतात...गांधीने काय केलं?
जोक नाही 1920 ते 1948 अशी तब्बल 28 वर्ष 30 कोटी भारतीयच नाही तर जगावर मोहिनी घातली होती या माणसाने...अशी कोणती ताकद ह्या महात्म्यात होती??
विचार करायला हवा की नाही?
    तरीही... काहीही असो...गांधी मरत नाही...तो सारखा आडवा येतो...तो शांत बसूच देत नाही आपल्याला...
गांधींचं कौतुक तर कराल नाहीतर त्याला शिव्यातर द्याल पण आपण गप्प बसू शकत नाही...काहीच नाहीतरी किमान खिशातल्या कुबेरपत्रांवर तरी गांधी दिसतोय का हेच नीट चष्म्यातून बघून अस्सल नोटा स्वीकारतो आपण...गांधीला दुर्लक्षित करू शकत नाही हेच त्याचं खूप मोठं यश आहे आणि म्हणूनच गांधी 'महात्मा' आहे...
-✍✍ दयानंद माने

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...