गुरुवार, २१ मे, २०२०

#हितगुज माझं...माझ्याशी...

#स्वगत...
   एखाद्याला सहकार्य-मदत करताना, मला माहित असलेले किंवा येत असलेले कोणालाही शिकवताना,ज्यातलं मला थोडंफार कळतं त्याबद्दल सल्ला,माहिती देताना, एखाद्याशी चांगलं वागताना,चांगलं बोलताना,त्याच्यापासून मला काहीतरी फायदा होईल म्हणून मी हे करत नसतो.तसा कोणताही उद्देश मनात नसतो.पण माझं एक उद्दिष्ट नेहमी असतं,कि हे सगळं करताना लोकांचा त्रास कमी होतो,त्यांचा वेळ-पैसा-श्रम वाचतो. त्यामुळं ते खूष होतात, समाधानी होऊन थ्यांक्यु म्हणतात.आपल्याकडे पाहून काही लोक समाधानाने,कृतज्ञतेने मनापासून स्मितहास्य करतात आणि मग आपसूकच आपल्याला पण खूष आणि भारी वाटतं.
     वास्तविक, मला आवडतं, मला भारी वाटतं म्हणून मी एखादी गोष्ट करतो. कोणीतरी चांगलं म्हणावं,कौतुक करावं किंवा माझं नाव व्हावं,मला प्रसिद्धी मिळावी किंवा कुठूनतरी माझा फायदा व्हावा म्हणून अजिबातच मी काही करत नाही.पण ह्यात एक अविभाज्य आणि सुंदर गोष्ट अशी आहे की,आपण अजिबात वाईट न वागता, कोणालाही जाणीवपूर्वक त्रास न देता शक्य तेवढं जितकं जास्तीत जास्त सहकार्य करू, आपुलकीने-प्रेमाने बोलू तितकं आपलं जगणं सहज आणि सोयीचं होतं. आपला उद्देश असो अथवा नसो पण आपण पेरलेले कुठेही आणि केव्हाही उगवतेच आणि आपल्या वाटेत येणाऱ्या संकटाला आधीच अडवते.आपली सगळी कामे आपण पेरलेल्या लोकांमुळे सहज होऊन जातात.म्हणजे उद्देश न ठेवतासुद्धा कामे तर होतातच पण अपवादाने कामे नाही झाली तरी उद्देश पूर्ण न झाल्याचा त्रास होत नाही. उलट आपण ठरवलेल्या काही तत्वांचा, नियमांचा अवलंब करून आपण स्वतःला खूष आणि संतुष्ट करत असतो.आपली भूमिका आपण शक्य तितकं कळकळीने आणि इमानदारीने वठवत आहोत हे समाधान ही गोष्टच जबरदस्त भारी आहे."मला हे करून छान वाटतं, मला हे करताना मजा येते म्हणून मी हे करतो.बस्स!"Thats It...!!
-दयानंद
(हे मला कोणीही विचारलं नाही बरं... मलाच स्वतःला प्रश्न पडला...मीच मला विचारलं दया एखादी गोष्ट आपण का करतो
आणि मीच मला उत्तर दिलं...तेच स्वगत...हितगुज माझं माझ्याशी)

मंगळवार, ५ मे, २०२०

#कृष्ण...हिरो कृष्ण...

    Actually मला व्यक्तिशः राम आणि कृष्ण यातला कृष्ण जास्त आवडतो...राम आदर्शवादी व्यक्तिमत्व होतं पण रावणवध सोडून फारकाही त्यांनी केलं नाही.कोणतीही नवीन व्यवस्था किंवा बदल त्यांनी केला नाही जो पुढे कित्येक वर्षे मानवजातीला मार्गदर्शन करेल.आणि सीतेचा त्याग ही गोष्ट तर कोणी कितीही समर्थने दिली तरी मला व्यक्तिशः आवडलेलं नाही.
तर Imagine Mahabharat without Krishna...
काहीही म्हणा पण महाभारताचा खरा नायक कृष्णच आहे...
कृष्ण होता त्या प्रत्येक वेळी कृष्णानेच पांडवांना योग्य वाट दाखवली होती...फक्त एकदा कृष्ण सोबत नव्हता तर द्युत(जुगार) खेळण्याएवढं अधःपतन पांडवांचं झालं.इतर वेळी कृष्ण नसता तर काय झालं असतं? श्रीकृष्णासारखा माणूस Friend-Philosopher-Guide म्हणून आपल्याला लाभला पाहिजे.पांडवांना तो लाभला कारण ते स्वच्छ,सरळ,न्यायी,सत्प्रिय,चारित्र्यसंपन्न होते...
तर माझं आवडतं व्यक्तिमत्व-कृष्ण.हा ज्याचा नायक आहे ते महाभारत,सर्व काळात माणूस व्यक्ती-पुत्र-बाप-नेता-पती-पत्नी-सून-भाऊ-कन्या-नागरिक-आजोबा-सासू-सासरा-मित्र-गुरू-शिष्य-मंत्री म्हणून कसे वागू शकतो आणि माणसाने ह्या सर्व भूमिकांत कसे वागावे आणि कसे वागू नये हे शिकवते.
श्रीकृष्ण अधिक जवळचासुद्धा वाटतो कारण सर्वसामान्य माणूस जेजे करतो त्या सगळ्या गोष्टी त्याने केल्या.श्रीकृष्ण एक चांगला मित्र-भाऊ-प्रियकर-राजा होता.
पूर्ण महाभारतात शांतीसाठी आणि युद्ध होऊ नये म्हणून त्याने खूप प्रयत्नसुद्धा केले. शेवटी शांततेचे सगळे मार्ग बंद झाल्यावर त्याने युद्ध हा मार्ग निवडला.
    जेव्हा एका स्त्रीवर अन्याय होत होता आणि सगळे महान(ग्रेट) म्हणवणारे निर्लज्जपणे शांत बसले होते तेव्हा श्रीकृष्ण तिच्या संरक्षणासाठी धावला.(हे प्रतिकात्मक किंवा सांकेतिक असलं तरीही)
म्हणून श्रीकृष्ण इथे ग्रेट ठरतो.
जेव्हा कायद्याने,युद्धनियमानुसार वाईटाचा पराभव करू शकत नव्हतो तेव्हा पांडवांनीसुद्धा थोडासा बेकायदेशीर पण व्यावहारिकदृष्ट्या योग्य मार्ग अनुसरायला श्रीकृष्णाने सांगितलं.म्हणजे दीर्घ चांगल्या परिणामासाठी आणि वाईट घडू नये म्हणून कायदा(नियम),शपथ मोडणेसुद्धा योग्य आहे हे त्याने सांगितले.
त्याचा मित्र जेव्हा मार्ग चुकत होता,Confused-दिशाहीन होत होता तेव्हा त्याला 'भगवद्गीता'  सांगून योग्य मार्गावर आणले.भगवद्गीता' त्यातल्या काही गोष्टी,मूल्ये यासाठी आजही आपल्याला मार्गदर्शक आहे.मुलीचे लग्न तिच्या मनाविरुद्ध होऊ नये आणि तिची आवड व कंसेंट ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हे त्याने स्वतःची बहीण सुभद्रा हिला अर्जुनासोबत कुटुंबाचा विरोध पत्करून विवाह करायला मदत केली ह्यावरून समजते .इथं तो खरा आदर्श भाऊ,योग्य पुरुष ठरतो.सुदामा आणि नंतर अर्जुन यांच्याबाबतीत तर श्रीकृष्णाने आदर्श मित्र कसा असावा याचा वस्तुपाठच घालून दिला आहे.माणूस म्हणून अनेक भूमिका निभावताना Practically आयुष्य कसे असते,माणसाने त्यात कसे वागावे आणि कसे वागू नये हे शिकवणाऱ्या महाभारताचा 'श्रीकृष्ण' नायक आहे.
रामायण पेक्षा महाभारत मला जास्त जवळचे म्हणजे मार्गदर्शक वाटते.महाभारत Evergreen आहे.मानवी स्वभाव,मूल्ये,चांगलं आणि वाईट,सत्य-असत्य-न्याय-अन्याय ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित महाभारतात मांडलेल्या आहेत.
निष्ठा,वचन,प्रतिज्ञा अशा सबबी सांगून वाईट लोकांना साथ देणे म्हणजे फालतुपणा आहे आणि शपथ-प्रतिज्ञा-निष्ठा-वचन-कायदा हे सगळं जर वाईटाला साथ देत असेल तर त्या शब्दांना आणि तत्वांना काहीच किंमत नाही हे भीष्म,द्रोण,कर्ण ह्यांचा वध करून श्रीकृष्णाने दाखवून दिले.
चांगलं-सत्य-न्याय याच्या दीर्घ कल्याणासाठी तात्पुरता कायदेभंग-वचनभंग-प्रतिज्ञाभंग योग्य असतो.
श्रीकृष्ण खूप Flexible(लवचिक) माणूस आहे.सगळ्या Rigid गोष्टी त्याने मोडीत काढल्या.
म्हणूनच तो देव म्हणून नाही तर एक माणूस म्हणून,मित्र म्हणून जवळचा वाटतो.तो नेहमी मार्गदर्शन करतो.तो ग्रेट आणि भारी माणूस वाटतो.
--चि. दयानंद

रविवार, ३ मे, २०२०

#तर...#जस्ट गंमत...

     तर...एकंदरीत आपल्या खोलीत पुस्तके, पेपर्स वगैरे असतात...ती बघून, वाचून आनंद वगैरे देतात...
बाहेर माणसं वगैरे असतात...संध्याकाळ वगैरे होत असते आणि बाहेर छान हवा वगैरे असते...आपल्याला प्रत्यक्ष भेटायची इच्छा असलेले ' Offline' मित्र वगैरे असतात...आजूबाजूला लोकांच्या, लहान मुलांच्या सुंदर करामती वगैरे चालू  असतात आणि त्या ज्जाम हसवणाऱ्या वगैरे असतात...आपल्याला कुटुंब, आईपप्पा-ताई-बायको-मुलं-मित्र वगैरे असतात...त्यांच्याशी बोलता वगैरे येतं...रेडिओ छान गाणी वगैरे ऐकवतो...आसपास मैदाने, बागा वगैरे असतात...आणि त्यांचा उपयोग खेळायसाठी वगैरे होत असतो...घरी आज्जी-आजोबा वगैरे असतात...ते छान छान किस्से, अनुभव वगैरे सांगत असतात...जवळपास छानछान,सुंदरसुंदर माणसं वगैरे असतात...ती आपल्या आसपास मजेशीर, मनोरंजक चेहरे घेऊन वावरत असतात...ते पाहून आनंद वगैरे मिळतो...चंद्रसूर्य वगैरे उगवत-मावळत असतात...एखाद्याला प्रत्यक्ष भेटून 2 मिन. बोलल्यास आपल्याला खूप आशीर्वाद आणि प्रेम, वगैरे मिळत असतं, छान वगैरे वाटत असतं...प्रवासात थंड, नशिली हवा वगैरे झोम्बत असते...एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन इथं व्हरायटीचे, मजेशीर नमुने वगैरे असतात, रस्त्याने चालताना झाडं, छानछान घरं वगैरे असतात...अजून बरंच काहीकाही वगैरे असतं....
तर हे सगळं, मोबाईल-फेसबुक-व्हाट्सअप्प-टिकटॉक-गेम्स-टीव्ही वगैरे बंद(म्हणजे कमी) केलं तर वगैरे कळतं...😃
असो...
#टीप: हे सगळं मोबाईल वरूनच लिहिले आहे अशी प्रतिक्रिया वगैरे येऊ शकते...पण हे सगळं सांगण्यासाठीसुद्धा मोबाईल वगैरे घ्यावा लागला...म्हणजे मोबाईल प्रमाणात वगैरे वापरावा...
असो...😃😃
इति किर्तनम संपुष्टम....
#जस्ट गंम्मत ✍चि. दया😃

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...