शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

# Gandhi#मजबुरी या मजबुती?#प्रश्न आणि उकल

~~"विचारांचा सामना विचारांनीच करने जेव्हा अशक्य होऊन बसते तेव्हा अशा विचारस्रोताचाच बळी घेतला जातो...कारण या राक्षसी,भ्याड मानसिकतेत सामना करण्याची तेवढी हिम्मतच नसते. आणि म्हणूनच अशा महामानवांचा नियोजनपूर्वक बळी घेतला जातो आणि मग या हत्यारयांचे अंध समर्थक सुद्धा लगेच तयार होतात. (विषाणूंसारखेे)~~
      
       हे महात्म्या तू या देशासाठी आयुष्य वेचले. का केले हे  सगळे? अजूनही आम्हाला तू समजलाच नाही. नव्हे आम्हीच तुला समजून घेतले नाही. तू एवढे महान कार्य केले ते विसरून आम्ही तुझ्या चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टीनाच लक्ष्य करतोय. त्याच गोष्टीना लक्ष्य करुन तुझ्यावर टिका केली जाते. टीकाही ठीक आहे. मतभेद असतील तर टिका होइलही. पण काही लोक(या लोकांना 'कुबेरपत्रांवरच' फक्त गांधी चालतो) जेव्हा तुझ्याविषयीच्या गैरसमजातून तुझ्यावर टोकाच्या द्वेषाने जहरी टिका करतात तेव्हा हृदय सुन्न होतं.टीका करा(टीका व्हायला हवी,अंधानुकरण अजिबात न करता जरूर प्रश्न विचारायला हवेत) पण काही लोक तुझा घोर अनादर करतात. तुझे कार्य आणि सदगुण घेणे सोडून तुझ्यावर टिका करण्यातच आमचा वेळ घालवतोय आम्ही.आमच्यापैकी बरेच इतरांना फक्त criticize करण्यातच धन्यता मानत आहेत(यापेक्षा जर सकारात्मक गोष्टींवर focus केले तर किती उत्तम! असो) तुही माणुसच होतास. काही गोष्टी तुही चुकला असशील. तुझ्याही जीवनात काही विरोधाभास जाणवत असतील. पण महात्मा म्हटल्यावर् त्याची एकही चूक क्षम्य नाही असाच आम्ही(व्यक्तिपूजक ?) समज करुन घेतलाय.

     तुझा अभ्यास न करताच आम्ही तुझ्यावर टिका करतो. तसा तुही समजायला कठिण आहेस आणी म्हणूनच की काय आम्ही तुझ्याविषयी जास्त विचार अणि अभ्यास न करता तुझ्या टिकाकारांनी केलेल्या लेखनावर विश्वास ठेवतो. (यामुळेच आम्ही आमच्या महापुरुषांतच भांडणे लावली आहेत). तू खरंच महात्मा आहेस का? तू वापरलेल्या अहिंसेच्या मार्गाने कुठे स्वातंत्र्य मिळते का? तू ब्रिटिशांचा agent होतास का? तुला राष्ट्रपिता म्हणावयास हवे का?. यांसारख्या प्रश्नावर चर्चा करण्यातच आम्ही आमचा वेळ खर्च करतोय.
(गांधींनी किंवा कोणत्याही महापुरुषाने हेच का केले किंवा हेच का नाही केले असा प्रश्न कधीच, काहीही ना केलेली माणसे विचारतात तेव्हा वाईट वाटते)

एका मानसशास्त्रीय तत्वानुसार जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आकलनापलिकडे आणि क्षमतेच्या बाहेर असते तेव्हा त्या गोष्टीचा माणूस द्वेष अन टीका करू लागतो.
       आणि हे तुपण म्हणत नाहीस की फ़क्त माझ्यामुळेच स्वातंत्र्य मिळाले.तर सर्व देशभक्तांच्या समर्पणाने ते मिळाले आहे हेे तुही मान्य करतोस. स्वातंत्र्यानंतर कोणत्याही राजकीय पदाचा मोह या माणसाने ठेवला नाही हे लक्षात घ्यायला हवे. माझ्या देशबांधवांना कपडे मिळत नाहीत म्हणून गांधींनी आयुष्यभर फक्त गरजेपुरते कपडे घातले. अगदी सुभाषचंद्रानीच तुला पहिल्यांदा राष्ट्रपित्या  हे सम्बोधन वापरले...भगतसिंहानी 'मी नास्तिक का आहे' या लेखात तुझा महात्माजी असा उल्लेख केला आहे...आणि आम्ही भगतसिंह, सुभाषचंद्र, सावरकर याना तुझ्या विरोधात बसवतो. त्यांनाही तुझ्याविषयी आणि तुलाही त्यांच्याविषयी आदर होताच. पण त्यांचा आणि तुझा मार्ग वेगळा होता. प्रसंगी त्यानी तुझ्यावर आणि तू त्यांच्यावर टीकाही केलिस.....पण कींचितही अनादर नव्हता तर फ़क्त वैचारिक मतभेद होते. 

*गांधी-सावरकर:-सावरकरांना मानणाऱ्या काही लोकांनी गांधीहत्या केली पण म्हणून त्यात सावरकरांना दोषी ठरवता येत नाही. सावरकरांसारखा माणूस असे भ्याड कृत्य करेल असे व्यक्तिशः मला वाटत नाही(पण असेही वाचले आहे की न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले आहे आणि तपासही पुरेसा झाला नव्हता म्हणजे तपास यंत्रणा कमी पडली होती असेही मी वाचले आहे.त्यामुळं लगेच याबद्दल निष्कर्ष काढता येणार नाही. सावरकर आणि गांधीहत्या याबद्दल निश्चित असा निष्कर्ष अजून काढता आलेला नाहीये...स्वातंत्र्यवीर सावरकर दोषी की निर्दोष याबद्दल अजून अभ्यासाची गरज आहे.

*गांधी-सुभाषचंद्र:- मतभेद होते पण मनभेद नव्हते. नेताजींनीच सर्वप्रथम गांधीजींना आझाद हिंद रेडिओवरून राष्ट्रपित्या म्हणून संबोधले होते.एवढेच काय आझाद हिंद सेनेच्या एका ब्रिगेडचे नाव सुभाषचंद्रांनी 'गांधी ब्रिगेड' ठेवले होते. चले जाव चळवळ सुरू झाली तेव्हा नेताजी बोलले होते, की आज मी बापूंसोबत पाहिजे होतो(@बर्लिन)

*गांधी- बाबासाहेब(आपल्यासाठी हेच खरे साहेब आहेत):- 

गांधीजी आधी राजकीय स्वातंत्र्य अन राजकीय सुधारणा साठी प्रयत्नशील होते. तेच त्यांचे प्राधान्य होते. आणि डॉक्टरांना आधी सामाजिक सुधारणा हव्या होत्या. दोघांच्याही प्राधान्यक्रम वेगळे होते. आणि गांधींनी स्वतः नियम केला होता, जर आंतरजातीय विवाह असेल आणि त्यातील एक दलित असेल तरच मी तिथे जाईन. आणि गांधीजी चळवळीसोबतच अस्पृश्यता विरोधी काम करत होते. मान्य आहे की चळवळीला त्यांनी जेवढा वेळ दिला तेवढा त्यांना दलितांसाठी देता आला नाही. उलट बाबासाहेबांचे प्राधान्य चळवळीला नव्हते तर अस्पृश्यता विरोधी होते. म्हणून त्यांना त्यासाठी जास्त वेळ देता आला. आणि म्हणून, त्यांनी हरीजनासाठी काहीच नाही केले, ते हरीजनांसाठी दांभिक होते असे म्हणने मला चुकीचे वाटते.

गांधींनीच स्वातंत्र्यानंतर संविधान सभेसाठी डॉक्टर बाबासाहेबांचे नाव काँग्रेस ला सुचवले होते. दलित बंधूंना हरिजन म्हणजे हरीचे-ईश्वराचे लोक असे गांधीजी म्हणत. हरिजन हे वृत्तपत्रदेखील ते चालवायचे. डॉक्टर बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यात वैचारिक मतभेद आणि मार्ग भिन्न होते पण ते दोघेही एकमेकांचा प्रचंड आदर करत होते.
काही लोक म्हणतात की गांधींनी आंबेडकरांना त्रास दिला...पण डॉक्टरांना पुणे कराराचा निर्णय मान्य नव्हता. त्यांना हिंदूंपासून पूर्णतः वेगळ्या जागा हव्या होत्या.पण आधीच ब्रिटिश आपल्यात फूट पाडत आहेत त्यात हिंदू-दलित ही फूट नको...उलट विभक्त मतदारसंघांऐवजी हिंदूंतर्गतच दलितांना राखीव जागा देऊ केल्या आणि ब्रिटिशांनी दिलेल्या 71 जागांपेक्षा जास्त म्हणजे 148 जागा गांधीजींनी दलितांना दिल्या.
इथे बाबासाहेबानी तो निर्णय मान्यसुद्धा केला पण काही गोष्टी डॉक्टरांना पटल्या नाहीत म्हणून डॉक्टरांना गांधीजींनी त्रास दिला असे होऊ शकत नाही असे मला वाटते.

**उपवास--यात स्वतःला त्रास करून घेणे असते. यात दुसऱ्याची मानसिक कुचंबना कुठं होते?
उलट संवेदनशील माणसाचे मतपरिवर्तन करण्याचा तो एक मार्ग आहे. आणि समोरच्या व्यक्तीला त्याची चूक लक्षात येते तेव्हा अपराधीपणा वाटणे मनुष्यस्वभाव आहे. यात उपोषनकर्त्याने कुचंबणा नाही केली तर उलट समोरच्या व्यक्तीला बदलास प्रवृत्त केले.

*ब्रम्हचर्य--गांधीजींचे ब्रह्मचर्य हे त्यांनी एकट्याने ठरवले नव्हते तर पतिपत्नी दोघांनी पूर्ण विचारांती एकमेकांच्या मान्यतेने स्वीकारले होते. तो एकतर्फी निर्णय नव्हता.

*प्रार्थना--यात कोणालाही खिजवण्याचा हेतू असूच शकत नाही. तो, ज्याचा त्याचा स्वयंभू निर्णय असतो. ती काही कोणावर लादली जात नाही. उलट विरोधकांबद्दलसुद्धा चांगली भावना निर्माण होण्याचे सामर्थ्य यावे हा हेतू असतो.

आणि स्वतःच्या हक्कांसाठी किंवा परिवर्तनासाठी लढताना अहिंसा वापरताना, कोणालाही खिजवणे किंवा घाबरवणे हा हेतू नसतो. उलट जर असे वाटत असेल तर त्यात प्रतिपक्षाचा कोतेपणा किंवा असमर्थता दिसून येते. आणि समोरच्याला चूक निदर्शनास आणून देणे हा अंतस्थ हेतू असतो.

प्रार्थनेचा आग्रह...तो ऐच्छिक आणि वयक्तिक होता. अनिवार्य नव्हता.
आणि secular म्हणजे स्वतःची धर्मश्रद्धा मानून इतरांचा आदर करणे.

आणि प्रार्थनेचा उद्देश काय होता?
फक्त लोकांना एकत्र आणणे आणि शत्रूबद्दल सुद्धा चांगळू भावना निर्माण होऊन मनोबल वाढवण्यासाठी. जेणेकरून अहिंसेसठी लोक मानसिकरित्या तयार होतील.
यात कसला आलाय सनातनीना?

*55 कोटी:- नैतिकता आणि दिलेला शब्द व केलेला करार पाळणे हे महत्वाचे होते तसेच भविष्यात वाद नको आणि आंतराष्ट्रीय पातळीवर आपली बाजू स्वच्छ राहण्यासाठी गांधीजी पाकला 55 कोटी द्यावे यावर ठाम होते. आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण कोणाची उधारी नाही ठेवत.(हा आपला मोठेपणा आहे)
आणि आपल्या देशात शांतता हवी असेल तर शेजारच्या देशात शांतता असणे आवश्यक असते. आणि गांधीजींनी 55 कोटी द्यावेत असा आग्रह धरला पण उपोषण त्यासाठी नाही केले तर सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी केले होते.

*गांधी-भगतसिंह:- शहीद-ए-आझम भगतसिंहांची फाशी माफ व्हावी म्हणून स्वतः गांधी आयर्विन यांना भेटले होते. पण ब्रिटिशांनी चळवळ खच्ची करण्यासाठी नियोजित वेळेअगोदर त्यांना फाशी दिली. ईथे ब्रिटिशांनी गांधींजिंच ऐकलं नाही. पण फाशीसाठी लोक गांधीलाच का दोष देतात?

*अहिंसा-- गांधीजींची अहिंसा ही Absolute किंवा अतिताठर नव्हती. तर ती हृदयपरिवर्तनावर आधारित होती. आणि आवश्यक व अपरिहार्य स्थितीत त्यांनी हिंसेचे समर्थन केले आहे. उदा- पाकविरुद्ध काश्मिरात लष्कर पाठवायला त्यांनी समर्थन दिले होते. गांधी म्हणायचे..."भित्रेपणा, लाचारपणा आणि हिंसा यातली निवड करायला सांगितली तर मग हिंसा करा असे मी म्हणेन पण भित्रेपणा नाही"

आणि गांधीजींनी सगळ्यात आधी अहिंसेचा प्रयोग आफ्रिकेत करून पाहिला. तो यशस्वी झाल्यावरच भारतात त्यांनी त्याचा अवलंब केला.
आणि भारतीय समाजमनाची नाडी त्यांनी ओळखली होती. आपण नेहमी सुरक्षित आणि कमी धोक्याचा मार्ग चोखाळतो. आणि हाच सुरक्षित असा सत्याग्रहाचा मार्ग गांधीजींनी भारताला दिला. त्यावेळच्या 30 कोटी जनतेला तो योग्य वाटला आणि ती गांधींसोबत गेली. मग हे 30 कोटी लोक वेडे होते का?
खुद्द भगतसिंह त्यांच्या अखेरच्या दिवसात बोलले होते. की आमच्या हिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणे अवघड वाटत आहे. कदाचित दुसरा मार्ग अवलंबावा लागेल.
आणि महात्मा गौतम बुद्धाचा शांती आणि अहिंसेचा वारसा आपण अभिमानाने सांगतो पण तेच सांगणाऱ्या आणि जगणाऱ्या गांधीला मात्र आमचे लोक दोष ठेवतात.

गांधीजी कधीच त्यांच्या गोष्टी कोणावर लादत नव्हते. आणि पूर्वीच्याच मतावर आग्रही न राहता...ते बोलले होते- माझ्या 2 मतांत विरोधाभास आढळला तर माझे 2 रे विधान बरोबर मानावे.

     खरेतर अहिंसक व्यक्ती आपल्या हक्कांसाठी लढत असतो. आणि समोरचा त्याच्या प्रवृत्तीनुसार हिंसा करतो. अहिंसक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हिंसा करण्यास प्रवृत्त करत नाही...आणि आपले हक्क मिळवणे म्हणजे राजकीय फायदा मिळवणे असही होत नाही...

*गांधीहत्या-- जेव्हा हत्याऱ्यांना हिरो बनवले जाते तेव्हा ते अधोगतीचे लक्षण असते. गांधीहत्या करणार्यांनी काय साध्य केले? त्यांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान काय? आणि गांधीहत्येचे समर्थन करणारे जे फाळणीचे कारण सांगतात...ती फाळणी टाळण्यासाठी या लोकांनी काय प्रयत्न केले होते?
आणि 1935 दरम्यान जेव्हा फाळणीचा गंधही नव्हता तेव्हा याच हत्यार्यांनी गांधीहत्येचा प्रयत्न का केला होता?
आणि जर एवढीच फाळणीची चाड होती तर मग फाळणीचे खरे खलनायक मोहम्मद अली जिनांना तो न्याय का लावला नाही? तर मग फाळणीचा प्रश्नच मिटला असता ना....!
     
(*काही लोक जाणीवपूर्वक 'गांधीवध हा शब्द वापरतात.त्यांनी हे लक्षात घ्यावे कि 'वध' वाईट गोष्टींचा करतात चांगल्या नाही.
हि हत्या होती,वध नाही.)

      आईनस्टाइन ,जॉर्ज बर्नार्ड शॉ, नेल्सन मंडेला, मार्टिन लूथर किंग, मार्क ट्वेन, होची मिन्ह, दलाई लामा,जयप्रकाश नारायण, बाबा आमटे, यांसारख्या अगदी थोर महापुरुषांनी देखील तुझा गौरव केलाय. आंग सान स्यू कि, बराक ओबामा तुला हिरो मानतात. याचाच अर्थ तू खुप महान आहे. पण तूझी महानता समजून घेण्यात आम्ही कमी पड़तोय....तुझी तत्वे apply करण्यास अवघड असल्याने आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष करतो. माझ्या मित्रांना एवढेच आवाहन आहे की. कृपया तुमचे गांधीजीशी किंवा कोणत्याही महामानवाशी मतभेद असतील तर जरूर असुद्या पण जगाने गौरवलेला तो एक महात्मा आहे. आणी आपण अजुन तर तेवढे प्रगल्भ झालो आहोत का ? की एवढ्या लवकर निष्कर्ष काढू. तर मित्रांनो मतभेद असुद्या पण टोकाचा अनादर करू नका. अगोदर गांधीचा(कोणत्याही महापुरुषांचा)  स्वतः अभ्यास करा अणि मगच ठरवा. 
"Either you are with Gandhi or against Gandhi, but you can't ignore Gandhi"

     भारताबाहेर मार्टिन लूथर किंग, नेल्सन मंडेला, आंग सान स्यू कि आणि अनेकांनी गांधीचा मार्ग अवलंबला आणि त्याना यशही मिळाले. हे सत्य आहे. आज आम्हाला जास्त थांबता येत नाही, आम्हाला Instant Result हवे असतात आणि गांधीवाद Apply करायला अवघड पण आहे. म्हणूनच आम्ही तिकडे पाठ फिरवतो....गांधी Instant नाही पण Constant Result नक्कीच देतो.

     फाळणीच्या तर गांधी विरोधात होते. पण त्यांच्या अनुपस्थितित कांग्रेसला त्यांच्या इच्छेविरुद्ध तो ठराव पास करावा लागला. माझ्या देहाची अगोदर वाटणी करा आणि मग देशाची, हे गांधीजी उद्गारले होते.
      काही विरोधाभासही असतील  पण तुही एक माणूस होता आणि तुही चुकु शकतोस हे आम्ही समजून घेतले पाहिजे.पण महात्मा म्हणून त्याची कोणतीच चूक क्षम्य नाही असा आम्ही समज करून घेतलाय.(चुका केल्या हे सांगत नाहीये फक्त आम्ही काय चूक करतो ते सांगतोय.)

आणि सर्वात शेवटी, अल्बर्ट आइनस्टाइन यांचे वाक्य आठवते,
"Generations to come, it may be, will scarce believe that such one as this ever in flesh and blood walked upon the earth"
" येणाऱ्या पिढयांना, कदाचित, विश्वास ठेवणे कठीण होईल की असा एक रक्तामांसाचा माणूस पृथ्वीवर होऊन गेला"

आणि अगदी खरंय हे!

*नम्र विनंती-कृपया मी कोणताही "----वादी" नाही.माझ्या अल्पमतीनुसार जे योग्य वाटले ते मांडले आहे.त्यामुळे गांधीवादी आहेका? असा वरकरणी भोळा प्रश्न विचारू नये...मी कोणत्याच विशिष्ट चौकटीत बसत नाही...म्हणजे कोणालाच विशिष्ट चौकटीत बसवणं चुकीचं आहे.

*कळकळीची विनंती-- काही क्षुद्र लोक त्यांच्या राजकीय, धार्मिक किंवा प्रसिद्धी स्वार्थासाठी दिशाभूल करत असतात.अशा अपप्रचाराला, व्याख्याने-कीर्तने-पुस्तके यांना बळी न पडता आपण स्वतः अभ्यास करून तर्क आणि विवेकाधारे निष्कर्ष काढावा.
--चि. दयानंद माने
*विशेष सूचना:किमान एकदातरी शाम बेनेगल यांची 'Making Of Mahtma' ही फिल्म आणि रिचर्ड अटेनबरो याचा 'Gandhi' हा ऑस्करविजेता मूवी नक्की पहावा...

#मागील वर्षीचीच पोस्ट पुन्हा...
✍✍ चि. दयानंद
02/10/2020

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...