आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे...
बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठे झालो म्हणून खूपच गंभीर राहून काही होत नाही....तर फक्त रक्तदाब वाढतो...अगदी किरकोळ, छोट्याछोट्या गोष्टीवरसुद्धा हसू आले पाहिजे... खूष होता आले पाहिजे... मुळात बालकाच्या अपेक्षाच खुप कमी असतात...फक्त निव्वळ निरागसता, कुतुहल(Curiosity) हीच गोंडस मूल्ये असतात त्याची...लोक काहीतरी म्हणतील म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचं टाळतो...छोट्याछोट्या मजेशीर गोष्टी करणे टाळतो...मनमुरादपणे, निखळ हसणे टाळतो...लोक वेडे ठरवतील हा विचार न करता मनाने बालक होता आले पाहिजे...कारण लोक काही साखरेच्या,रक्तदाबाच्या गोळ्या घेऊन येणार नाहीत...त्या आपल्यालाच घ्याव्या लागतील...पुन्हा एकदा सुप्त बालमनाला उभारी देऊया....बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा....
✍🏻 चि.श्री. दयाआनंद 😃