बुधवार, १६ मार्च, २०२२

#लायटीच्या प्रकाशात एका अस्तित्व संपलेल्या 'चिमणीचे मनोगत...

'नमस्कार!!धिस इज कॉल्ड ऍज 'कंदील'.ह्यात मी बसले आहे.माझं नाव चिमणी, मी पूर्वी उजेड द्यायची.पण आत्ता 'लायटी'च्या 'प्रकाशा'त माझं अस्तित्व नाहीसं झालंय. आणि माझं खाद्यही रॉकेल हे रेशन दुकानात मिळणासं झालंय.पुर्वी उजेड कमी होता पण पारदर्शकता खूप होती.घरातल्या माणसांची मने मला आणि सगळ्यांना स्पष्ट,साफ दिसायची.आत्ता लायटीचा उजेड वाढला आणि माणसांची स्पष्ट दिसणारी मने अधिकच अंधुक, अस्पष्ट दिसू लागली.जेव्हा लाईट नव्हती तेव्हा लोकांना माझ्याशिवाय पर्याय नव्हता.पण आत्ता माझी गरज संपली आणि देव्हाऱ्याजवळ असणारी मी आत्ता भंगारात गेले.पण भंगारात जाऊन माझं अस्तित्व संपण्याचं मला दुःख नाही.माणसाची प्रगती झाली, त्याचं जीवन अधिक प्रकाशमय झालं ह्याच आनंदात मी सगळं विसरले.पण कुठेकुठे अजूनही माझी आठवण म्हणून अडगळीत का होईना मला जिवंत ठेवलं आहे.अंधारातून उजेडातला माणसाचा प्रवास मी पाहिला आहे.पूर्वी माणसांची मने माझ्या उजेडात खूप मोकळी व्हायची पण आत्ता 'चिमणी' नसूनही त्यांच्या मनावर  चिंता,भ्रम,अहंकार,गैरसमज यांची इतकी काजळी चढली आहे कि कोणाच्याच मनाचा थांग मला लागेनासा झालाय.मला पूर्वी ऐकु येणारा कोणाचाच मनमोकळा संवाद आत्ता ऐकू  येईनासा झालाय.माझं अस्तित्व अजूनही आदिवासी,दुर्गम भागात आहे.कधीकधी वाटतं कि इथं लाईट नकोच यायला. या आदिवासी लोकांमधला जो प्रेमाचा संवाद आहे तो तरी लायटीच्या उजेडात हरवायला नको.माझं अस्तित्व पूर्ण नाहीसं होण्याअगोदर पुन्हा एकदा शेवटचं, लायटीच्या उजेडात माणसांचा मनमोकळा संवाद मला ऐकायचा आहे....बस्स!
✍️✍️ श्री.दयाआनंद माने

गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

#असलं वागणं बरं नव्हं...😅

'चारित्र्य पडताळणी' फॉर्म.हा महा-ई-सेवा केंद्र मध्ये काढता येतो.पण मुळात चारित्र्य पडताळणी चे मोठमोठे फ्लेक्स आपला समाज चौकाचौकात लावत असतो.अनेक लोकांच्या चारित्र्य पडताळणीची चर्चा पारावर चालू असते.आपला समाज घरातले,भावकीतले,पावणे पासून ते मंत्री, अधिकारी, अभिनेते यांच्यापर्यंत चारित्र्य ह्या गोष्टीची म्हणजेच लफड्यांची चर्चा करत असतो.आपल्याला गावात कुत्रं विचारत नसतं पण आपण मंत्र्यांच्या लफडयाची चर्चा करत असतो.खायला पीठ नसलं तरी चालेल पण लोकांच्या लफड्यांच्या चर्चेचं 'विचारपीठ' पारावर भरलं पाहिजे.हळू आवाजात कुजबुज चालू असते.लोकांना मज्जा येते अशा चर्चांमध्ये.विषयच इंटरेस्टिंग असतो तर.होय का नाही? "ज्याची स्वतःचीच नीतिमत्ता ढासळलेली असते कित्येकदा; तो लोकांना शिकवतो नैतिकता', दया म्हणे असले वागणे बरे नाही,आपलेची ते आपण पाहणे, दुसरेची वाकून बघू नये" तर असो...अभंग संपला, किर्तन संपलं.आज एका पुस्तकात कथा वाचली त्यातून हे लिहावं वाटलं.तर सहज सुचलं म्हणून हे #जस्ट गंम्मत...😃😃✍️ दयानंद

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...