शनिवार, ९ मार्च, २०१९

#चिमण्या-पाखरं

     आमच्याकडे रब्बी हंगामात 'पाखरं राखणे' हा शब्दप्रयोग सुगीच्या अलीकडे सर्रास वापरला जातो...Actually 'पाखरं राखणे' म्हणजे 'पाखरं न राखता' पाखरांपासून धान्य राखणे(वाचवणे) असा होतो.म्हणजे गोफण घेऊन धोंडे मारणे, मानवी कपड्यांची बुजगावणी उभारून पाखरांना घाबरवणे इत्यादी...
     तर ह्यावर्षी आपल्या शेतात दुष्काळी परिस्थितीतसुदधा ज्वारीनं चांगलीच उभारी घेऊन ती मस्त फोफावली आहे.यावर्षी दुर्दैवानं आमच्या सोलापूर जिल्ह्यात खूप ठिकाणी ज्वारी उपजलीच नाही...
त्यामुळं पाखरांना खायला काहीच नाहीये...त्यामुळं आई-पप्पांसोबत  'पाखरांवर' रम्य चर्चा सुरू असताना पप्पांना मी म्हटलं, यावर्षी आपण 'पाखरं राखायची' नाहीत...त्यांना किती खायचं ते खाऊ द्या. त्यांनी खाऊन जे शिल्लक राहिल ते आपल्याला...कारण कित्येक दिवस गायब असलेली पाखरं जथ्यांनी दिसायला लागली हे काय कमी आनंदाचं हाय व्हय!
      3 दिवसांपूर्वीच एक दोस्त म्हणाला, दया, आरं लका हल्ली चिमण्या-पाखरं कुठं दिसंना झाल्यात...बहुतेक 'दुसऱ्या पाखरांवरचं' लक्ष हटवुन ते जर खऱ्या पाखरांकडं दिलं तर आजूबाजूला दिसतील वाटतंय चिमण्या-पाखरं...😃
    आणि सुदैवानं, चिक्कार चिमण्या-पाखरं आपल्या घरात आणि शेतात अगदी सहकुटुंब रोज तळ ठोकून असतात...कित्येकांना पाखरं बघायला आवर्जून ट्रिप काढून जावं लागतं, अशा जमान्यात आपल्या घरात पाखरांनी यावं, किलबिलाट करावा आणि त्यांच्या चिवचिवाटाने अक्ख घर उजळून,संगीतमय व्हावं यासारखं दुसरं भाग्य नाही हो..

-दया म्हणे😃✍

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...