Actually मला व्यक्तिशः राम आणि कृष्ण यातला कृष्ण जास्त आवडतो...राम आदर्शवादी व्यक्तिमत्व होतं पण रावणवध सोडून फारकाही त्यांनी केलं नाही.कोणतीही नवीन व्यवस्था किंवा बदल त्यांनी केला नाही जो पुढे कित्येक वर्षे मानवजातीला मार्गदर्शन करेल.आणि सीतेचा त्याग ही गोष्ट तर कोणी कितीही समर्थने दिली तरी मला व्यक्तिशः आवडलेलं नाही.
तर Imagine Mahabharat without Krishna...
काहीही म्हणा पण महाभारताचा खरा नायक कृष्णच आहे...
कृष्ण होता त्या प्रत्येक वेळी कृष्णानेच पांडवांना योग्य वाट दाखवली होती...फक्त एकदा कृष्ण सोबत नव्हता तर द्युत(जुगार) खेळण्याएवढं अधःपतन पांडवांचं झालं.इतर वेळी कृष्ण नसता तर काय झालं असतं? श्रीकृष्णासारखा माणूस Friend-Philosopher-Guide म्हणून आपल्याला लाभला पाहिजे.पांडवांना तो लाभला कारण ते स्वच्छ,सरळ,न्यायी,सत्प्रिय,चारित्र्यसंपन्न होते...
तर माझं आवडतं व्यक्तिमत्व-कृष्ण.हा ज्याचा नायक आहे ते महाभारत,सर्व काळात माणूस व्यक्ती-पुत्र-बाप-नेता-पती-पत्नी-सून-भाऊ-कन्या-नागरिक-आजोबा-सासू-सासरा-मित्र-गुरू-शिष्य-मंत्री म्हणून कसे वागू शकतो आणि माणसाने ह्या सर्व भूमिकांत कसे वागावे आणि कसे वागू नये हे शिकवते.
श्रीकृष्ण अधिक जवळचासुद्धा वाटतो कारण सर्वसामान्य माणूस जेजे करतो त्या सगळ्या गोष्टी त्याने केल्या.श्रीकृष्ण एक चांगला मित्र-भाऊ-प्रियकर-राजा होता.
पूर्ण महाभारतात शांतीसाठी आणि युद्ध होऊ नये म्हणून त्याने खूप प्रयत्नसुद्धा केले. शेवटी शांततेचे सगळे मार्ग बंद झाल्यावर त्याने युद्ध हा मार्ग निवडला.
जेव्हा एका स्त्रीवर अन्याय होत होता आणि सगळे महान(ग्रेट) म्हणवणारे निर्लज्जपणे शांत बसले होते तेव्हा श्रीकृष्ण तिच्या संरक्षणासाठी धावला.(हे प्रतिकात्मक किंवा सांकेतिक असलं तरीही)
म्हणून श्रीकृष्ण इथे ग्रेट ठरतो.
जेव्हा कायद्याने,युद्धनियमानुसार वाईटाचा पराभव करू शकत नव्हतो तेव्हा पांडवांनीसुद्धा थोडासा बेकायदेशीर पण व्यावहारिकदृष्ट्या योग्य मार्ग अनुसरायला श्रीकृष्णाने सांगितलं.म्हणजे दीर्घ चांगल्या परिणामासाठी आणि वाईट घडू नये म्हणून कायदा(नियम),शपथ मोडणेसुद्धा योग्य आहे हे त्याने सांगितले.
त्याचा मित्र जेव्हा मार्ग चुकत होता,Confused-दिशाहीन होत होता तेव्हा त्याला 'भगवद्गीता' सांगून योग्य मार्गावर आणले.भगवद्गीता' त्यातल्या काही गोष्टी,मूल्ये यासाठी आजही आपल्याला मार्गदर्शक आहे.मुलीचे लग्न तिच्या मनाविरुद्ध होऊ नये आणि तिची आवड व कंसेंट ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हे त्याने स्वतःची बहीण सुभद्रा हिला अर्जुनासोबत कुटुंबाचा विरोध पत्करून विवाह करायला मदत केली ह्यावरून समजते .इथं तो खरा आदर्श भाऊ,योग्य पुरुष ठरतो.सुदामा आणि नंतर अर्जुन यांच्याबाबतीत तर श्रीकृष्णाने आदर्श मित्र कसा असावा याचा वस्तुपाठच घालून दिला आहे.माणूस म्हणून अनेक भूमिका निभावताना Practically आयुष्य कसे असते,माणसाने त्यात कसे वागावे आणि कसे वागू नये हे शिकवणाऱ्या महाभारताचा 'श्रीकृष्ण' नायक आहे.
रामायण पेक्षा महाभारत मला जास्त जवळचे म्हणजे मार्गदर्शक वाटते.महाभारत Evergreen आहे.मानवी स्वभाव,मूल्ये,चांगलं आणि वाईट,सत्य-असत्य-न्याय-अन्याय ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित महाभारतात मांडलेल्या आहेत.
निष्ठा,वचन,प्रतिज्ञा अशा सबबी सांगून वाईट लोकांना साथ देणे म्हणजे फालतुपणा आहे आणि शपथ-प्रतिज्ञा-निष्ठा-वचन-कायदा हे सगळं जर वाईटाला साथ देत असेल तर त्या शब्दांना आणि तत्वांना काहीच किंमत नाही हे भीष्म,द्रोण,कर्ण ह्यांचा वध करून श्रीकृष्णाने दाखवून दिले.
चांगलं-सत्य-न्याय याच्या दीर्घ कल्याणासाठी तात्पुरता कायदेभंग-वचनभंग-प्रतिज्ञाभंग योग्य असतो.
श्रीकृष्ण खूप Flexible(लवचिक) माणूस आहे.सगळ्या Rigid गोष्टी त्याने मोडीत काढल्या.
म्हणूनच तो देव म्हणून नाही तर एक माणूस म्हणून,मित्र म्हणून जवळचा वाटतो.तो नेहमी मार्गदर्शन करतो.तो ग्रेट आणि भारी माणूस वाटतो.
--चि. दयानंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा