#सोशल मीडिया
#फेसबुक-व्हाट्सअप्प
#मोबाईल
1)वेळ कमी पडतोय तरीही आपल्याला बोअर का होतंय?
उत्तर-एखादी गोष्ट करणं आणि ती करतानाचा आनंद घेणं आपण सोडून दिलं आहे.एकत्र आलो तरी सेल्फी आणि ग्रुप फोटोसाठी एकत्र येतो.तेवढंच पुढच्या आठवड्यात स्टेटस ला खुराक होऊन जातो.मित्रांची भेटपण यांत्रिक झाली आहे फक्त सोशल मीडियावर दाखवण्यासाठी.सोशल मीडियावर दाखवायला काहीच नाही राहीलं की लोकांना नैराश्य यायला लागतं.
2) आपण व्हाट्सअप्प आणि फेसबुक वर तासन्तास चॅटिंग करतो...
हे खरंच बोरिंग नाही का?
डायरेक्ट भेटून बोललं तर किंवा फारतर फोनवर बोललं तर किती भारी ना!
बोलतानाचे हावभाव, इंटेन्सीटी,शब्दावरचे जोर, आवाजातील चढउतार हे चॅटिंग करताना जाणवतं का हो?
किंवा दोनचार पाने लिहून समोरच्या व्यक्तीला पाठवलं तर?
तासभर चॅटिंग करूनसुद्धा संभाषन आणि संवाद शून्यच झालेला असतो.
तेच महिन्यातून फक्त एक फोन केला तरी उत्तम संवाद होतो. नाही का?
3)मी खूप खूष आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप रसिक आहे, मी जगण्याचा खूप आनंद घेतो, मी खूप सोशल आहे, मला सामाजिक-राजकीय गोष्टींमधील बरंच काही कळतं...
किंवा
मी खूप टेन्शन मध्ये आहे, मी दुःखी आहे, माझं ब्रेकअप-पॅचअप झालंय,
मी खूप अडचणींचा सामना करतोय.
माझ्या वैयक्तिक, कौटुंबिक आयुष्यात हेहे चांगलं किंवा वाईट चालू आहे.मी खूप बिझी आहे, मी खूप गरीब किंवा पैसेवाला आहे, मी भारी भारी मोबाईल-गाडी वापरतो किंवा अतिशय साधे राहतो,
हे सगळं फेसबुक, व्हाट्सअप्प वर सांगायची खरंच गरज असते का हो?
त्याने खरंच फायदा होतो का?
कोणाला किती फायदा झाला कोणी कृपया सांगेल का? हे सगळं आपण सोशल करायची गरज असते का?
म्हणजे माणसाने व्यक्त व्हावं, बोलावं, आपलं म्हणणं आणि आपले अनुभव लोकांशी share जरूर करावेत पण त्याला काहीतरी नियम, पद्धत, प्रमाण असेल ना?
म्हणजे आपलं खासगी जीवन आपण सगळ्यांसमोर उगाच खुलं का करतो?
आपण खरंच आपल्या खासगीपणाचा आनंद घेतो का?
जर आपण खरंच आनंद घेत असू तर मग आपल्या बऱ्याच जणांचे चेहरे मी पाहतो तेव्हा सारखेच उदास, निराश, तणावात का असतात?
4) पिच्चर पाहायला थिएटर ला गेलो तर इंटर्व्हलमध्ये लगेच मोबाईल उघडतो.पण विचार करतो का?
की पिच्चर मध्ये काय घडलं? पुढे काय घडेल? मित्राच्या लग्नात गेलो की फोटो टाकायचीच आपली गडबड असते.आपण मित्राच्या घरच्यांची, नातेवाईकांची चांगली ओळख करून घेतो का?तिथला परिसर, माणसे यांच्याशी आपले बंध जुळवतो का?फोटोमधली किती माणसे आपल्याला चांगलं ओळखत असतात? घरात नवीन काहीतरी केलं,आणलं तर घरच्यांचं कौतुक कमी आणि फोटो जास्त होतात.नाही का?
5) मोबाईल आणि सोशल मीडिया चा अतिशय भयंकर घाण नाद लागला आहे आपल्याला.माणसे बोलत असतात, घरी कुटुंबीय बोलत असतात, आजूबाजूला छानछान गोष्टी घडत असतात, आपला मित्र किंवा मैत्रीण जीव तोडून बोलत असतात आणि आपण शहाणे काय करत असतो?
तर किती लाईक्स मिळाल्या?कोणी काय पोस्ट केलं?सारखं बोटं खालीवर स्क्रोल करत असतो.डोकं बधिर व्हायला लागलं आहे. बऱ्याच गोष्टी लक्षात राहिना झाल्या आहेत लोकांच्या . लोकांचं डोकं मोबाईलमुळे कमी काम करायला लागलं आहे..
6) रविवारी सुट्टी आहे.फक्त पूर्ण एक दिवस मोबाईल पूर्ण बंद ठेवायचा आणि संध्याकाळी स्वतःची अवस्था बघायची.सकाळी आणि अगदी संध्याकाळपर्यंत जीव कसनुसा अस्वस्थ होतो.कुठंच मन लागत नाही.पण रात्री झोपताना छान वाटायला लागतं.5 मिन झाले की लहान लेकराने चड्डी ओली केली का? तसे कोणाचा msg आला का ते पाहावे लागते.10 मिन करमत नाही mob शिवाय.हे सत्य आहे की नाही?सगळेच असे नाहीत पण बरेचजण आहेत.ज्यांना मोबाईल चांगला वावरता येतो त्यांना सलाम.पण ज्यांना तो नीट वापरता येत नाही त्यांच्यासाठी ह्या माझ्या उचापती."मोबाईल ही एक आपल्यासाठी आपणच बनवलेली वस्तू आहे आणि ती आपल्याच खिशात आहे. कुठं पळून जाणार नाही. तो आपल्यासाठी आहे नाकी आपण मोबाईलसाठी" हे ज्यांना कळलं त्यांना सलाम आणि बाकीच्यांना-कळावे🙏🏻
7) मलासुद्धा कधिकधी मोबाईल जास्त वापरला की डोकं सुन्न व्हायला लागतं.काही गोष्टी लक्षात राहत नाहीत.आणि त्याच्यापासुन दूर राहिलं की डोकं चांगलं काम करतं. परवा चष्म्याचा नंबर तपासायला गेलो तेव्हा चर्चा झाली आणि मग बोलताबोलता डॉक्टरनी सांगितलं की हल्ली बऱ्याच लोकांचे डोळे रडतात-पाणी गाळतात.मोबाईल खूप वापरल्यामुळे.तुम्हीही जास्त वापरत असाल तर प्लिज कमी करा सर. स्क्रीन लाईट मुळे डोळे खराब होतात. हे मला MBBS-डोळेतज्ञ यांनी सांगितलं बरंका.मलासुद्धा मोबाईल चा थोडा नाद आहे.पण मी मोबाईल चा वापर कमी करत आलो आहे.अजून कमी करायचा आहे.किमान जाणीव तरी झाली आहे की हे प्रमाणात व्हावं.अती होऊ नये.
#शेवटी काय तर "जान है तो जहाँ है।"
8) सोशल मीडिया, मोबाईल अजिबातच वाईट नाही. आपण ज्या पद्धतीने तो वापरतो ती पद्धत वाईट आणि हानिकारक आहे...
वस्तू, Utility कशी Use करावी हे कळणं ह्यालाच शहाणपण म्हणतात...
बाकी काही नाही...
#सगळं चांगलंच आहे...What Matters Is...The Way We Behave with the Utilities That We have Invented For Our Convenience and not for Sticking them as A Trap...
🙏🏻😃🕵
--✍✍चि. दयानंद
#TheDayaSays
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा