#भारतीय नागरिकहो....
#एकदा विचार कराल प्लिज?
शेतकऱ्यांच्या हमीभावाचं काय झालं?
शेती उत्पन्नवाढीचं काय झालं?
घटत असलेल्या शेतीक्षेत्राचे आणि शेतीच्या घटणार्या उत्पादकतेचे काय झाले?
चांगले रस्ते कुठं गेले?
खड्डे कुठून आले?
वाड्यावस्त्या, दूरस्थ खेडी यांच्या रस्त्याचे काय झाले?
नोकऱ्या/रोजगार कुठं गेले?
नवीन उद्योग/व्यवसाय निर्मिती आणि वाढीचं आणि त्यासाठीच्या सहाय्याचे व सहजतेचे काय झाले?
प्रशासनात रिक्त असलेल्या अनेक पदांच्या भरतीचे काय झाले?
कर्मचाऱ्यांवर असलेल्या अतिरिक्त ताणाच्या कामांची पर्यायी व्यवस्था करण्याचे काय झाले?
मनुष्यबळ विकास ह्या संकल्पनेच्या खोलवर अंमलबजावणीचे काय झाले?
शाळांच्या सुविधांचे काय झाले?
शिक्षणाच्या गुणवत्तावर्धनाचे काय झाले?
सहज-आनंदी शिक्षणाचे काय झाले?
मराठी शाळा, मराठी भाषा संवर्धनाचे काय झाले?
सशस्त्र दलांकडे असलेल्या शस्त्रांच्या व सुविधांच्या आणि त्यांच्या दर्जाच्या वाढीचं काय झालं?
पोलिसांच्या कामाच्या पद्धतीत आणि त्यांच्यावरच्या अतिरिक्त कामांमुळे खालावत जाणाऱ्या सेवेच्या दर्जात सुधारणा करण्याचे काय झाले?
लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या वाढवून त्यांना आणखी सक्षम व सुप्रशिक्षित करून त्यांच्या शस्त्र, व वाहनांच्या दर्जात करायच्या सुधारणांचे काय झाले?
तुंबणाऱ्या गटारी, नाले आणि त्यामुळं जलमय होणारी शहरे आणि गावांची सुधारणा कोण करणार?
साध्यासाध्या पायाभूत सुविधांचे आणि Fast Connectivity चे काय झाले?
दवाखान्याच्या सुविधांचे काय झाले?
चांगल्या औषधांचे/डॉक्टरांचे काय झाले?
अलीकडे प्रचंड वाढलेल्या मानसिक आजारांबद्दल जनजागृती करून लोकांच्या मानसिक आरोग्याची काळजी कोण घेणार?
नागरिकांना सेवा मिळण्यात होणाऱ्या दिरंगाईचे/कुचराईचे आणि सेवेच्या दर्जाचे काय झाले?
रस्ते/नद्या/सार्वजनिक जागा यांच्या स्वच्छतेचे काय झाले?
भुजलसंवर्धन,वनआच्छादनवाढीचं काय झालं?
महिला आणि वृद्ध,बालके या अवलंबित्व असलेल्या लोकांच्या सुरक्षितता, संगोपन, आणि सबलीकरणाचे काय झाले?
कितीतरी वर्षे रखडत चाललेल्या,सर्वसामान्यांच्या जिवावर बेतणाऱ्या असंख्य फायलींचं काय झालं?
सन्माननीय न्यायालयांत कित्येक वर्षे पेंडिंग पडलेल्या आणि वाढत जाणाऱ्या केसेस चा निपटारा करण्यासाठीच्या प्रयत्नांचे काय झाले?
वाढत जाणारी बुडीत कर्जे, बुडणारे उद्योग, बुडणाऱ्या बँका यांच्याबाबतीत करायच्या उपायांचे काय झाले?
कृपया मतदान करण्याआधी काही प्रश्न स्वतःला आणि सरकार,प्रशासन,नेते यांना विचारायला हवेत आणि त्यांची उत्तरे शोधायला हवीत...
जो कोणी वरील प्रश्न सोडवण्यासाठी लढला आहे किंवा लढतो आहे अशाच लायक माणसाला मत दिलं पाहिजे...
तरच आपल्याला 'आम्ही भारताचे नागरिक' म्हणवण्याचा अधिकार आहे...अन्यथा नाही...
जर आपण स्वतः जेव्हा आधी राजकीय व आर्थिक प्रगल्भ होऊ तेव्हाच आपण एक "प्रगल्भ,सुजाण लोकशाही" म्हणून वाटचाल करू शकू...
कोणीतरी म्हटलं आहे की
"People Get The Government, Leaders They Deserves..."
आपल्या पुढच्या पिढीला एक चांगली लोकशाही सुपूर्द करण्यासाठी हे केलंच पाहिजे...
काय म्हणता भारतीय नागरिकहो?
✍✍चि. दयानंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा