ज्याठिकाणी स्त्रीला इज्जत,सन्मान मिळत नाही अशा ठिकाणी कधीच शांतता नांदत नाही.स्त्रीचा शाप त्या वास्तूला लागत असतो.कोणत्याही स्त्रीला जर आपण सन्मान व आदर देत नसू तर आपल्या शिक्षणाला, नोकरीला,संपत्तीला, पैसा-जमीन-बंगला यांना काडीची किंमत नाही.जर आपण स्त्रीचा-आई-बहीण-पत्नी-मुलगी यांचा आदर ठेवत नसू आणि स्वतःचा फालतू,क्षुद्र,पुरुषी अहंकार कुरवाळत बसत असू तर आपण अतिशय 'नीच' वर्तन करत आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे.नुसतं मोठमोठ्या गप्पा मारून,तोंडाची वाफ करून कोणीही किंमत देत नसतो.जो माणूस म्हणून कोणत्याही स्त्रीला किमंत न देता,तिचं योगदान विचारात न घेता हिंसा,अन्याय करत असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याला कोणीही किंमत देणार नाही.
अतिशय जुनाट,बुरसटलेले विचार बाळगणाऱ्या माणसांना स्वतःला चांगलं म्हणून घ्यायचा नैतिक अधिकार नसतो.कारण कोणीही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नसतो.प्रत्येकजण कधीतरी आयुष्यात पाय घसरून पडलेला असतो.माणूस एकवेळ कमी शिकलेला असला तरी चालेल, बेघर-गरीब असला तरी चालेल पण तो स्त्रीला इज्जत देणारा असावा.
जिथं स्त्रीला इज्जत नाही तिथं 'राम-कृष्ण-पांडुरंग' सुद्धा नवसाला पावत नाहीत.आई-बहीण यावरून शिव्या देणारे तर अत्यंत नीच वृत्तीचे लोक असतात.ज्या आईच्या,बहिणीच्या कुशीत आपण मोठे होते त्यांचाच उद्धार करतो.मरताना स्वतःला माफ करू शकाल का तुम्ही? स्वतःला माणूस म्हणून घ्यायची योग्यता आहे का आपली? भलेभले संपले, माती झाली त्यांची!त्यांच्यापुढे आपण किस झाड की पत्ती?
विचार आणि वागण्यात बदल करणे गरजेचे आहे कारण चारित्र्य ही स्वतः जपण्याची गोष्ट आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा