#UCR
आपल्या पोस्ट खात्यात एक खूप छान पद्धत आहे आणि ती प्रत्यक्ष जीवनात सुद्धा खूप लागू पडते...
जेव्हा आपल्याला पैसे एक्सेस होतात...त्याचा नक्की संदर्भ
सापडत नाही, सोर्स चा निश्चित ताळमेळ लागत नाही...तेव्हा Unclassified Receipts (UCR) म्हणून ते हिशोबात घेतो...आणि मगच आपला डेली अकाउंट टॅली होतो...आणि UCP चंही तसंच आहे...व्हाईस व्हर्सा...
तसंच प्रत्यक्ष जीवनात सुदधा काही चांगल्या गोष्टी आयुष्यात मिळाल्या तर त्या UCR म्हणून आपल्या DAILLY ACCOUNT ला जमा कराव्यात आणि तो हिशोब तिथेच सोडून द्यावा...नव्या डेली अकाउंट वर त्याचं सावट नसावं...सुदैवानं आपल्याला प्राप्त झालेल्या या गोष्टींना 'उपकार' किंवा 'ऋण' असे प्रमाणपत्र बहाल करून स्वतःला फालतू ओझ्याखाली दबू देऊ नये......आणि आपण जेव्हा कोणाला काही देतो तेव्हा ते Unclassified PAYMENTS म्हणून द्यावं...त्याला 'उपकार' किंवा 'ऋण' याचं सर्टिफिकेट लावु नये...'कोणावर तरी उपकार करत आहोत' असं फील बिलकुल नाही करायचं...
थोडक्यात काहीही नैसर्गिकरित्या आपल्याला मिळालं म्हणजे 'भाग्य' किंवा लक म्हणून उड्या मारण्यात...आणि काहीही अपघाताने आपण गमावलं तर दुःख करण्यात काहीच अर्थ नाही...
थोडक्यात ज्याला आपण नशीब कींवा दुर्दैव म्हणतो अश्या सर्व 'प्राप्त' आणि 'लुप्त' दोन्ही गोष्टीत आपलं काहीच कर्तृत्व नसतं किंवा आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी असतात त्या...
त्यामुळं जे मिळालं त्याबद्दल गर्व आणि जे गमावलं त्याबद्दल खेद करण्यात काहीच अर्थ नाही...
त्यामुळं UCR आणि UCP करत राहिलो तर दैनंदिन खाते नीट जुळेल आणि भविष्यात स्वतःकडून आणि समाजाकडून होणाऱ्या Inspection मध्ये काही प्रॉब्लेम आले किंवा काही अपवाद घडला तर आपण सहीसलामत सुटून जाऊ...आणि UCR, UCP टेक्निक मुळे आपल्याला मग जास्त काही लक्षात ठेवायचीही गरज पडणार नाही...काही गोष्टींचा अजिबातच हिशोब ठेवायचा नसतो त्या गोष्टी UCR ,UCP केल्या तर त्यामुळं मेंदूला फक्त खऱ्या नितांतसुंदर गोष्टीच लक्षात ठेवाव्या लागतील...
#आणि मग जीवन सुंदर आहेच...
#आपल्याच कामातून शिकायचा छोटा प्रयत्न...
#PostDiary...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा